डॉ. प्रितम शेलार यांना राज्यपालांच्या हस्ते उत्कृष्ट डेंटल क्लिनिक पुरस्कार

औरंगाबाद,९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 1 फेब्रुवारी रोजी दंतवैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेबद्दल राज्यातील दंतवैद्यकांना ‘एक्सलन्स इन डेन्टिस्ट्री’ पुरस्कार राजभवन येथे प्रदान करण्यात आले. औरंगाबाद चे प्रसिद्ध डेंटल व ओरल सर्जन डॉ प्रितम शेलार यांच्या डेंटल क्लिनिक ला बेस्ट डेंटल क्लिनिक चा ह्या वर्षीचा अवॉर्ड राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे मिळाला 

दंतवैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेबद्दल राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते नुकतेच राज्यातील दंतवैद्यकांना ‘एक्सलन्स इन डेन्टिस्ट्री‘ पुरस्कार राजभवन येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.  ‘मेडियुष‘ या दंतवैद्यकांच्या संघटनेच्यावतीने हे पुरस्कार देण्यात आले.यावेळी महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाच्या बोधचिन्हाचे तसेच बोधवाक्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

यावेळी समाजामध्ये वाढलेल्या मौखिक आरोग्य विषयी असलेल्या समस्या व त्यामुळे होणारे दुष्परिणाम व त्यातून शासना सोबत सर्व दंत वैद्यनी कसे समाज प्रबोधन करायला या विषयावर बोलताना  डॉ.शेलार म्हणाले तंबाखू जन्य पदार्थ सेवन सवय ही जास्त करून 14-20 वर्षाच्या मुला मध्ये सुरुवात होते. त्यावर आळा घालण्यासाठी शाळा व कॉलेज मध्ये मौखिक आरोग्य 

विषयी जनजागृती करण्यासोबत शाळा, कॉलेज च्या 1-2 किलोमीटर च्या परिसरात तंबाखू जन्य पदार्थ मिळण्याचे ठिकाण कायमस्वरूपी बंद केली पाहिजेत.आजची ओरल कॅन्सर चे प्रमाण बघता ही पावले उचलणे खूप आवश्यक असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. तसेच सरकार च्या सर्व नियम व अटी चे पालन प्रत्येक पान टपरी चालकाने करायला हवे. खरं तर पान टपरी ला सरकार ने licence आवश्यक करायला हवे व त्याकडे कुठल्या प्रकारचा माल विकला गेला पाहिजे यावर सरकारचे निरीक्षण असणं खुप गरजेचे आहे असे मत डॉ शेलार यांनी मांडले .

आधुनिक जीवन पद्धतीमध्ये जेवणानंतर चूळ न भरता ‘फिंगर बोल‘मध्ये हात धुण्याची पद्धत प्रचलित झाली आहे. दंतरोग्याच्या दृष्टीने ही पद्धत अतिशय चुकीची असून दंत वैद्यकांनी ही पद्धत बंद करण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.‘स्वच्छ मुख अभियान‘ हा चांगला उपक्रम असून असे अभियान निरंतर राबवावे. वैद्यकीय सेवा हा एक पवित्र व्यवसाय असून त्याचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावे असे राज्यपालांनी सांगितले.  

कार्यक्रमाला ‘मेडीयुष’चे सह-संस्थापक डॉ गोविंद भताने,आंतरराष्ट्रीय योग शिक्षिका डॉ. हर्षदा शेलार,महाराष्ट्र शासन चे ‘ओरल हेल्थ मिशन’चे डॉ दर्शन दक्षिणदास, इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ अशोक ढोबळे, सौंदर्यवर्धक व कृत्रिम दंतशास्त्र तज्ज्ञ  डॉ संदेश मयेकर, डॉ विवेक हेगडे,  कालिका स्टीलचे संचालक गोविंद गोयल तसेच दंतचिकित्सा क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.