७ वर्षांनी वेरूळ महोत्सव रंगणार ,२५ फेब्रुवारीपासून उस्ताद राशीद खान, शंकर महादेवन करणार कला सादर

औरंगाबाद,८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  2016 नंतर 7 वर्षांनी वेरूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 25 ते 27 फेब्रुवारी मध्ये हा महोत्सव होणार आहे. सोनेरी महलमध्ये हा महोत्सव होणार आहे. सोनेरी महाल येथे जागतिक दर्जाच्या सुप्रसिध्द कलाकारांमार्फत शास्त्रीय व उपशास्त्रीय, गायन व शास्त्रीय नृत्य इ. सादर केले जाणार आहे.

सदर महोत्सवामध्ये उस्ताद राशीद खान, उस्ताद सुजात खान, महेश काळे, रवी चारी, शिवमनी, विजय घाटे, संगीता मुजूमदार व शंकर महादेवन कला सादर करणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या पत्रकार परिषदेला मनपा आयुक्त अभिजित चौधरी पोलिस आयुक्त निखिल गुप्ता जी श्रीकांत मनीष कलवानिया यांची उपस्थिती आहे.

पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार

पांडे म्हणाले कीपर्यटन वाढीसाठी जागतिक स्तरावर औरंगाबाद जिल्हयाची ओळख प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालय सातत्याने प्रयत्न करते. विविध सेमीनार, परिषदा इ. चे आयोजन करुन अधिकाधिक पर्यटक येतील यासाठी प्रयत्न करते. औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने 1985 पासुन वेरुळ येथील कैलास लेणी समोरील जागेमध्ये जगविख्यात वेरूळ महोत्सव आयोजित करण्याची सुरूवात केली होती. सदर महोत्सवाचे रूपांतर 2002 पासून वेरूळ- अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात करण्यात आले. सदर महोत्सव जिल्हा प्रशासन, संयोजन समीती व पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यामाने करण्यात येतो. प्रतिवर्षी प्रमाणे सन 2016 साली वेरूळ- अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मागच्या काही काळात विविध कारणामुळे हा महोत्सव होऊ शकला नाही.

पूर्वरंग कार्यक्रम होणार

वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची घोषणा करणारा पूर्वरंग कार्यक्रमाचे आयोजन यानिमित्त करण्यात आले असून 12 फेब्रुवारी रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम होत आहे. संत एकनाथ रंगमंदिर येथे होत असलेल्या या कार्यक्रमात सोनिया परचुरे आणि टीम कृष्णा” बॅले ” सादर करतील. त्यानंतर “सांज अमृताची ” हा मराठी हिंदी गीतांचा विशेष कार्यक्रम होत असून गीत गझल सुफी संगीत याचा मेळ असलेल्या कार्यक्रमात शाल्मली सुखटणकर, आशिष देशमुख, मंदार आपटे, माधुरी करमरकर, हे गायक सहभागी होतील. सांज अमृताची कार्यक्रमाचे निवेदन धनश्री दामले करणार आहे. पूर्वरंग उद्घाटनानंतर हे कार्यक्रम होतील.

रावसाहेब दानवे (केंद्रीय राज्यमंत्री रेल्वे, कोळसा व खाण, भारत सरकार) आणि डॉ. भागवत कराड ( केंद्रीय राज्यमंत्री वित्त, भारत सरकार) यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून संदीपान भुमरे ( पालकमंत्री तथा रोहयो व फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र) यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल,