मिशन बिगीन अगेन अतंर्गत 30 सप्टेबर पर्यंतच्या कालावधीसाठी औरंगाबाद जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश जारी

औरंगाबाद, दि.02 :- शासन आदेशानुसार मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध सुकर करण्‍यासह लॉकडाऊनचा कालावधी दि. 30 सप्टेबर 2020 च्‍या मध्‍यरात्रीपर्यत वाढविण्‍यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद  जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व फौजदारी दंड प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) मधील तरतुदीनुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी (पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून)  मनाई आदेश जारी केले असून हे आदेश यापुढे दिनांक 30 सप्टेबर 2020 चे  24.00 वाजेपर्यंत लागू राहतील. तसेच पोलीस आयुक्तालय क्षेत्राबाबत पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे आदेश अंमलात राहतील. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये बाजार, दुकाने यांचे नियंत्रण करण्यासाठी आयुक्त महानगरपालिका यांना मुख्य सचिव यांच्या पत्रानूसार प्राधिकृत करण्यात आलेले आहे त्यानूसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्यांचे आदेश लागू राहतील. सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरुध्‍द  आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भा.दं.वि. 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्‍यात येईल.

वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्‍या कृत्‍यासाठी कुठल्‍याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्‍द कुठल्‍याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असे आदेशात नमुद केले आहे.

कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी परिशिष्ट 1 मध्ये निर्दिष्ट केलेल्या राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांचे संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात अनूपालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. यापुर्वी मान्यता दिलेल्या बाबी/व्यवहार आणि परिशिष्ट 2 मध्ये नमूद केलेल्या बाबी/व्यवहार सुरू राहतील आणि आधिचे सर्व आदेश या आदेशासी संलग्ण राहुन यापुढे 30 सप्टेंबर पर्यंत लागू राहतील. पुनश्च प्रारंभ अभियानातंर्गत शिथिलीकरणाबाबतचे पुढील आदेश यथावकाश अधिसूचित करण्यात येतील.

पुनश्‍चः प्रारंभ अभियान (MISSION BEGIN AGAIN)

परिशिष्‍ट-1

कोविड-19 च्‍या व्‍यवस्‍थापनाबाबतचे राष्‍ट्रीय निर्देश

1.    चेहरा झाकणे– सार्वजनिक ठिकाणी, कामाच्‍या ठिकाणी व प्रवास करतांना , चेहरा झाकणे अनिर्वाय आहे.

2.    सामाजिक अंतर राखणे- सार्वजनिक ठिकाणी, सर्व व्‍यक्‍तींनी कमीत कमी 6 फुट (2 गज की दूरी) इतके अंतर राखले पाहिजे.

दुकानदार, ग्राहकांमध्‍ये शारीरिक अंतर राखण्‍याची सुनिश्चिती करतील आणि एकावेळी पाचपेक्षा अधिक व्‍यक्‍तींना मुभा देणार नाहीत.

3.    एकत्र जमणे – मोठी सार्वजनिक संमेलने/भव्‍य सभा यांना मनाई असेल.

विवाह संबंधित कार्यक्रमात एकत्र जमणे-पाहुण्‍यांची कमाल संख्‍या 50 पेक्षा अधिक असणार नाही.

अंत्‍यसंस्‍कार/अंत्‍यविधी यासंबंधातील कार्यक्रमात व्‍यक्‍तींची संख्‍या 20 पेक्षा अधिक असणार नाही.

4.   सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे, संबंधित स्‍थानिक प्राधिकरणाव्‍दारे, त्‍यांचे कायदे , नियम, विनियम यांनुसार विहित करण्‍यात येईल अशा दंडाच्‍या शिक्षेस पात्र असेल.

5.   सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखु, इत्‍यादींच्‍या सेवनास मनाई आहे.

कामाच्‍या ठिकाणांबाबतचे अतिरिक्‍त निर्देशः

6.    घरातुन काम करणे –शक्‍य असेल तेथवर, घरुन काम करण्‍याची पध्‍दत अनुसरण्‍यात यावी.कार्यालये , कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठा आणि औद्योगिक व वाणिज्यिक आस्‍थापना यांमध्‍ये कामाच्‍या/कामकाजाच्‍या वेळांची सुनियोजितपणे आखणी करावी.

7.   परिक्षण (स्‍क्रीनिंग) व स्‍वास्‍थ्‍य – औष्णिक परीक्षण (थर्मल स्‍कॅनिंग),  हात स्‍वच्‍छ करण्‍याचे द्रव्‍य (हॅंडवॉश) व निर्जंतुकीकरण द्रव्‍य (सॅनिटायझर) हे सर्व प्रवेशव्‍दाराजवळ व निर्गमन व्‍दाराजवळ आणि सामाईक क्षेत्रांत पुरविण्‍यात येईल.

8.    वारंवार निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) –संपुर्ण कामाच्‍या ठिकाणाचे, सामाईक सुविधांचे व मानवी संपर्कात येणा-या सर्व जागा यांचे, उदाहरणार्थ दरवाजांच्‍या मुठी (डोअर हॅण्‍डल) , इत्‍यादींचे कामाच्‍या पाळयांमध्‍ये वारंवार निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करण्‍याची सुनिश्चितीकरण्‍याची दक्षता घ्‍यावी.

9.    सामाजिक अंतर राखणे- कामाच्‍या ठिकाणांच्‍या सर्व प्रभारी व्‍यक्‍ती, कामागारांमध्‍ये पुरेसे अंतर राखणे, कामाच्‍या पाळयांदरम्‍यान पर्याप्‍त अंतर ठेवणे, दुपारच्‍या जेवणाच्‍या वेळेत पुरेसे अंतर राखणे, इत्‍यादींव्‍दारे सामाजिक अंतर राखण्‍याची दक्षता घेतील.

परिशिष्‍ट-2

पुनश्‍चः प्रारंभ अभियान (MISSION BEGIN AGAIN)

1.       प्रतिबंधीत क्षेत्र

i.      महाराष्‍ट्र शासनाचे आदेश दिनांक 19 मे 2020 व दिनांक 21 मे 2020 मध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्राची वर्गवारी पुढील आदेशापर्यत कायम राहील.

ii.      प्रतिबंधीत क्षेत्र निश्‍चित करण्‍याबाबत व त्‍यातील क्रियाबाबत केंद्र शासन व राज्‍य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले मार्गदर्शक तत्‍वे पुढील आदेशापर्यत लागू राहतील.

iii.      साथरोगाचा प्रसार थांबविण्‍यासाठी स्‍थानिक परिस्थितीपाहून जिल्‍हाधिकारीअथवा महानगरपालिका आयुक्‍त हे स्‍थानिक क्षेत्रात परवानगी असलेले परंतु अत्‍यावश्‍यक नसलेल्‍या गतीविधीना तसेच लोकांच्‍या हालचालीस मा. मुख्‍य सचिव, महाराष्‍ट्र राज्‍य यांचे लेखी पुर्व परवानगीने प्रतिबंधीत करु शकतील.

2.      औरंगाबाद जिल्‍हयात प्रतिबंधीत असलेल्‍या बाबी

i.            शाळा, कॉलेज, शैक्षणीक संस्‍था, खाजगी शिकवण्‍यादिनांक 30 सप्‍टेंबर 2020 पर्यत बंद राहतील. ऑनलाईन/दुरस्‍थ शिक्षण सुरु राहील व त्‍यांना प्रोत्‍साहन देण्‍यात येईल.

ii.            चित्रपट गृहे, जलतरण तलाव, करमणूक केंद्रे, थिएटर (मॉल व मार्केट कॉम्‍प्‍लेक्‍समधील), बार, सभागृहे, प्रेक्षागृहेयासारख्‍या बाबी बंद राहतील.

iii.            गृह मंत्रालयाने परवानगी दिलेली व्‍यतिरिक्‍त आंतरराष्‍ट्रीय प्रवासी वाहतूक राज्‍य शासनाचे ठराविक आदेशानुसार चालू राहतील. 

iv.            सर्व सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणीक, सांस्‍कृतीक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठया संख्‍येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील.

3.      सर्व प्रकारची जीवनावश्‍यक वस्‍तु असलेली दुकाने /आस्‍थापना यापूर्वीच्‍या आदेशाप्रमाणे सुरु राहतील.

4.     औरंगाबाद जिल्‍हयात दिनांक 02.09.2020 पासून सुरु असणा-या बाबी

i.            सर्व प्रकारची अत्‍यावश्‍यक नसलेली सोई-सुविधा पुरविणारी दुकाने/आस्‍थापना यापूर्वी निर्गमित केलेल्‍याआदेशामध्‍ये नमूद असलेल्‍या सवलती व मार्गदर्शन तत्‍वाप्रमाणे सुरु राहतील.मद्यविक्रीची दुकाने सुरु राहतील.

ii.            हॉटेल्‍स/लॉजेस (निवास व्‍यवस्‍थेची) 100% क्षमतेसह सुरु राहतील. सदर आस्‍थापना सुरु करण्‍याबाबत घ्‍यावयाच्‍या प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेबाबत स्‍वतंत्र मार्गदर्शक तत्‍वे निर्गमित केली जातील.

iii.            सर्व राज्‍य शासकीय कार्यालय (अत्‍यावश्‍यक सेवा असलेली, आरोग्‍य व वैद्यकीय , कोषागारे, आपत्‍ती व्‍यवस्‍थापनविभाग, पोलीस, एनआयसी, अन्‍न व नागरी पुरवठा विभाग, FDI, N.Y.K, महानगरपालिका स्‍तरीय सेवा वगळता) ही खालील क्षमतेसनुसार सुरु राहतील.

a.       सर्व अ व ब वर्ग अधिकारी यांची 100 % उपस्थिती अनिवार्य असेल.

b.      अ व ब वर्ग अधिकारी वगळता उर्वरित कर्मचारी यांची उपस्थिती 50% किंवा कमीत कमी 50 कर्मचारी यापैकी जे जास्‍त असतील त्याप्रमाणे अनिवार्य आहे.

सर्व कार्यालयामध्‍ये कोव्‍हीड-19 प्रतिबंधात्‍मक उपाययोजना अंतर्गत घ्‍यावयाचे सर्व खबरदारीचे उपाय जसे की, सामाजिक अंतर, मास्‍क परिधान करणे इ.बाबत स्‍वतंत्र दक्षता अधिकारी यांची नेमणूक करण्‍यात यावी. तसेच सर्व कार्यालयातील प्रवेशव्‍दार व बाहेर जाण्‍याचा मार्गाच्‍या ठिकाणी तसेच सामाजिक वापराच्‍या ठिकाणी थर्मल स्‍कॅनिंगव्‍दारे तपासणी, हॅण्‍डवॉश, सॅनिटायझर यासारख्‍या प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांचा वापर बंधनकारक असेल. कर्मचा-यांना मास्‍क उलब्‍ध असावेत.

iv.            सर्व प्रकारच्‍या खाजगी आस्‍थापना या गरजेनुसार 30% क्षमतेसह सुरु राहतील.सर्व कर्मचा-यांकरीता घरी गेल्‍यानंतर घ्‍यावयाच्‍या काळजीसाठी करावयाच्‍या उपाययोजना विषयक जाणिव जागृती शिबिर आयोजित करुन घ्‍यावयाच्‍या प्रतिबंधात्‍मक उपाय योजनेबाबत प्रेरित करावे.जेणेकरुन सर्व कर्मचारी घरामध्‍ये गेल्‍यानंतर सर्व प्रकारच्‍या प्रतिबंधात्‍मक उपाय योजनांचा वापर करतील. ज्‍यामुळे घरातील लहान मुले वयस्‍कर व्‍यक्‍ती बाधित होणार नाही. सर्व कार्यालयामध्‍ये कोव्‍हीड-19 प्रतिबंधात्‍मक उपाय योजनांतर्गत घ्‍यावयाचे सर्व खबरदारीचे उपाय जसे की, सामाजिक अंतर, मास्‍क परिधान करणे इ.बाबत स्‍वतंत्र दक्षता अधिकारी यांची नेमणूक करण्‍यात यावी. व तसेच कार्यालयीन वेळा निश्चित करुन  फक्‍त कार्यालयीन कामांसाठी होणा-या हालचालीस परवानगी असेल.

v.        व्‍यक्‍ती आणि वस्‍तुंचे आंतरजिल्‍हा वाहतुकीवर निर्बंध असणार नाही.व्‍यक्‍ती आणि वाहनांच्‍या प्रवासासाठी कोणत्‍याही प्रकारच्‍या स्‍वतंत्र परवानगी/संमती /ई-परमिट/ई-पास याची आवश्‍यकता असणार नाही.

vi.            खाजगी बस, मिनी बस आणि इतर वाहतुकीच्‍या सेवाव्‍दारे होणारी प्रवासाच्‍या हालचालीस परवानगी असेल. तथापि मा.आयुक्‍त (परिवहन)महाराष्‍ट्र राज्‍य यांनी निर्गमित केलेल्‍या मार्गदर्शक तत्‍वाचे अवलंब करणे संबंधीतास बंधनकारक राहील.

5.     सर्व प्रकारच्‍या खुल्‍या मैदानातील शारीरीक हालचाली हया कोणत्‍याही बंधनाशिवाय सुरु राहतील.

6.      सर्व सार्वजनिक व खाजगी वाहनाव्‍दारे नागरीकांच्‍या हालचालीसाठी खालील प्रमाणे प्रवासी अनुज्ञेय असतील. प्रवासादरम्‍यान मास्‍कचा वापर करणे बंधनकारक राहील.

टॅक्‍सी+कॅब      1+3 फक्‍त अत्‍यावश्‍क सेवासाठी
तीन चाकी रिक्षा 1+2 फक्‍त अत्‍यावश्‍क सेवासाठी
चार चाकी 1+3 फक्‍त अत्‍यावश्‍क सेवासाठी
दुचाकी1+1 हेल्‍मेट आणि मास्‍कसह

7.     65 वर्षावरील व्‍यक्‍ती, Co-Morbiditesव्‍यक्‍ती गर्भवतीस्‍त्रीया, 10 वर्षाखालील लहान मुले यांनी शक्‍यतो घरीच थांबावे, फक्‍त अत्‍यावश्‍यक व वैद्यकीय सेवेसाठीच प्रवास करावा.

8.     सर्व प्रकारच्‍या व्‍यक्‍तींना अत्‍यावश्‍यक नसलेल्‍या सेवेसाठी करावयाच्‍या हालचाली करता येतील. परंतु याबाबत सर्व प्रकारच्‍या अनिवार्य उपाय योजना जसे की, मास्‍क परिधान करणे, सामाजि‍क अंतर राखणे आणि वैयक्तिक स्‍वच्‍छता इ. बंधनकारक असेल.

9.      खालील क्रिया/बाबी यापूर्वी नेमून दिलेल्‍या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे चालू राहतील.

i.                    केंद्रीय गृह मंत्रालय यांचेकडील आदेश दिनांक 2 एप्रिल2020 रोजी भारतीय परदेशी नागरिकांच्‍या संक्रमणासाठी पारित केलेल्‍या मार्गदर्शक सूचना.

ii.                  केंद्रीय गृह मंत्रालय यांचेकडील आदेश दिनांक 19 एप्रिल 2020 रोजी राज्‍यात व केंद्रशासित प्रदेशात अडकून पडलेल्‍या मजूराबाबत पारित केलेल्‍या मार्गदर्शक सूचना.

iii.                केंद्रीय गृह मंत्रालय यांचेकडील आदेश दिनांक 21 एप्रिल 2020 रोजी भारतीय समुद्र किना-यावर साईन इन व साईन ऑफ करणा-यांसाठी पारित केलेल्‍या मार्गदर्शक सूचना.

iv.                केंद्रीय गृह मंत्रालय यांचेकडील आदेश दिनांक 29 एप्रिल 2020 व 1 मे 2020 आणि महाराष्‍ट्र शासनाकडील आदेश दिनांक 30 एप्रिल 2020 रोजीच्‍या स्‍तलांतरित अडकलेले कामगार यात्रेकरुन,पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्‍यक्‍ती बाबत पारित केलेल्‍या मार्गदर्शक सूचना.

v.                  केंद्रीय गृह मंत्रालय यांचेकडील आदेश दिनांक 5 मे 2020 रोजी परदेशात अडकलेल्‍या भारतीय नागरिकांच्‍या हालचालीबाबत पारित केलेल्‍या मार्गदर्शक सूचना.

vi.                केंद्रीय गृह मंत्रालय यांचेकडील आदेश दिनांक 11 मे 2020 रोजी रेल्‍वे प्रवास करणा-या व्‍यक्‍तींसाठी पारित केलेल्‍या मार्गदर्शक सूचना.

vii.              महाराष्‍ट्र शासनाकडील आदेश दिनांक 13 मे 2020 रोजी रेल्‍वेने महाराष्‍ट्रात प्रवेश करणा-या व्‍यक्‍तींसाठी पारित केलेल्‍या मार्गदर्शक सूचना.

viii.            महाराष्‍ट्र शासनाकडील आदेश दिनांक 17 एप्रिल 2020 रोजीच्‍या कार्यालये,कामाची ठिकाणे, कारखाने, आस्‍थापना यांचेसाठी सामाजिक अंतराबाबत पारित केलेल्‍या मार्गदर्शक सूचना.

ix.                महाराष्‍ट्र शासनाकडील आदेश दिनांक 6 जुलै 2020 रोजी निवास व्‍यवस्‍था प्रदान करणारे हॉटेल व इतर आदरातिथ्‍य सेवा देणारे लॉज, आतिथीगृहे सुरु करण्‍याबाबत पारित केलेल्‍या मार्गदर्शक सूचना.

x.                  महाराष्‍ट्र शासनाकडील आदेश दिनांक 8 मे 2020, 24 मे 2020 आणि 21 ऑगस्‍ट 2020  रोजी आंतरराष्‍ट्रीय प्रवास करुन महाराष्‍ट्रात येणारे व्‍यक्‍तींसाठी पारित केलेल्‍या मार्गदर्शक सूचना.

xi.                महाराष्‍ट्र शासनाकडील आदेश दिनांक 25 मे 2020, रोजी देशातंर्गत विमान प्रवास करुन महाराष्‍ट्रात

येणा-या व्‍यक्‍तींसाठी पारित केलेल्‍या मार्गदर्शक सूचना.

xii.              महाराष्‍ट्र शासनाकडील आदेश दिनांक 23 जुन  2020रोजी लग्‍न समारंभासंबंधीत पारित केलेल्‍या मार्गदर्शक सूचना.

xiii.            महाराष्‍ट्र शासनाकडील आदेश दिनांक 25 जुन  2020रोजी केश कर्तनालय सलुन, ब्‍युटी पार्लर साठी पारित केलेल्‍या मार्गदर्शक सूचना.

xiv.            महाराष्‍ट्र शासनाकडील आदेश दिनांक 19 ऑगस्‍ट 2020रोजी महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या बसेस साठी पारित केलेल्‍या मार्गदर्शक सूचना.

10.   याव्‍यक्‍तीरिक्‍त एखाद्या आदेशाने बंदी अथवा सुट देण्‍यात आलेल्‍या क्रिया/बाबी कायम राहतील.

11.   प्रतिबंधीत असलेल्‍या बाबींना सुट देण्‍याची कार्यवाही टप्‍प्‍या टप्‍प्‍याने करण्‍यात येईल व त्‍याबाबतची स्‍वतंत्र मार्गदर्शक तत्‍वे निश्चित करण्‍यात येईल.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *