महिलांचा सन्मान वाढवणारा अर्थसंकल्प-भाजपा राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर

नवी दिल्ली,१ फेब्रुवारी / प्रतिनिधी:- सर्वसामान्य नागरिकांनी पासून ते शेतकऱ्यांपर्यंत आणि किरकोळ व्यापाऱ्यापासून ते उद्योजकांपर्यंत प्रत्येकाला काही ना काही देणार हा अर्थसंकल्प आहे. पण त्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा सन्मान वाढवणारा हा अर्थसंकल्प आहे अशा शब्दांत भाजपाचे राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले. ​

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत महिला सन्मान बचत पत्र जारी करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. या अंतर्गत दोन लाख रुपये महिला किंवा मुलीच्या नावावर दोन वर्षांसाठी जमा करता येतील. ?.??% व्याज सरकार देणार आहे. महिलांचे आर्थिक क्षमता त्याच्यामुळे वाढणार आहे महिला बचत गटांच्या सर्वांगीण विकासासाठी  नवी तरतूद करण्यात आली आहे. 

अर्थसंकल्पाचे भाषण ऐकताना प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावत होती.देशातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न नऊ वर्षांत दुप्पट होऊन 1.97 लाख रुपये झाले आहे.  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 11.7 कोटी घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत. उज्ज्वला अंतर्गत  9.6 कोटी एलपीजी कनेक्शन दिले आहेत. केंद्र सरकारच्या या सगळ्या योजनांचा सर्वाधिक फायदा महिलांना होत आहे.

कृषी क्षेत्रात यंदाच्या भरड धान्य वर्षांचं औचित्य साधून त्यांच्या लागवड, साठवण आणि वितरण विक्री साठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. भारतीय अन्न जगाच्या पटलावर जाणार आहे. 

मध्यमवर्गीयांसाठी हा अर्थसंकल्प क्रांतिकारी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आयकर मर्यादा वाढविण्याची मागणी होत होती. मोदी सरकारने ती पूर्ण केली आहे. सात लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न आता करमुक्त होणार आहे 

विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी सिंचन योजना साठी विशेष पॅकेज दिले जाणार आहे. त्यामुळे या भागाचा सिंचनाचा अनुशेष कमी होईल.

हाताने मैला उचलण्याची पद्धत बंद करून मशीनद्वारे मैला उचलला जाण्याची नवी योजना आणि मॅनहोल मध्ये कोणताही कर्मचारी उतरणार नाही यासंदर्भातील यंत्रणा हे मोदी सरकारच्या शोषित वंचिता विषयीच्या संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. 

देशाच्या अर्थचक्राला अधिक गती देण्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प  ‘बूस्टर डोस’ तर करणार आहेत पण त्याचबरोबर मोदी सरकारचा मानवी चेहरा यातून समोर आला आहे. समाजातील अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून त्याला विकासाच्या प्रक्रियेत आणण्याचे सामर्थ्य या अर्थसंकल्पाने निश्चित मिळेल