157 नवीन नर्सिंग महाविद्यालयांची स्थापना

नवी दिल्ली,१ फेब्रुवारी / प्रतिनिधी:-केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहारमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 संसदेसमोर सादर केला.

नवीन नर्सिंग महाविद्यालये

इंडिया@100  आणि अमृत काळ समोर ठेऊन केंद्रीय वित्त मंत्र्यांनी 157 नवीन नर्सिंग महाविद्यालांच्या स्थापनेची घोषणा केली. 2014 पासून स्थापन केलेल्या 157 महाविद्यालयांच्या सह-स्थानांवर नवीन महाविद्यालये स्थापन करण्यात येतील.

सिकल सेल अ‍ॅनिमिया निर्मूलन मोहीम

श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सिकल सेल निर्मूलन मोहिमेचा आरंभ केला. या मोहिमेअंतर्गत आदिवासी बहुल क्षेत्रातील 0-40 वयोगटातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांचे समुपदेन करण्यात येणार आहे.

संशोधन आणि विकासासाठी आयसीएमआर प्रयोगशाळा उपलब्ध

वैद्यकीय क्षेत्रात नवोन्मेषाला चालना देण्यासाठी सरकार निवडक आयसीएमआर प्रयोगशाळा खाजगी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना संशोधनासाठी उपलब्ध करुन देणार आहे.

औषधनिर्माण क्षेत्रात संशोधन आणि नवोन्मेष

औषधनिर्माण क्षेत्रात संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी उत्कृष्ट केंद्रांच्या माध्यमातून नवीन कार्यक्रम हाती घेतला जाईल,  अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. “आम्ही उद्योगांना विशिष्ट प्राधान्य क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकासासाठी गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करू”, असे अर्थमंत्री म्हणाल्या.


वैद्यकीय उपकरणांसाठी समर्पित बहुशाखीय अभ्यासक्रम

वैद्यकीय क्षेत्रातील भविष्यकालीन वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाच्या उत्पादनाचे महत्त्व अधोरेखित करताना अर्थमंत्री सीतारामन यांनी  भविष्यकालीन वैद्यकीय तंत्रज्ञान,  उच्च दर्जाचे उत्पादन आणि संशोधन यासाठी कुशल मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी विद्यमान संस्थांमध्ये वैद्यकीय उपकरणांसाठी समर्पित बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमांची घोषणा केली.