आसाराम बापू दोषी:कोर्ट आज  शिक्षा सुनावणार

गांधीनगर:-भोंदू अध्यात्मिकगुरू आसाराम बापूला २०१३ मधील एका बलात्कार प्रकरणात गुजरातमधील गांधीनगर सत्र न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले आहे. मंगळवारी न्यायालय आसाराम बापूला शिक्षा सुनावणार आहे. सूरतमधील एका तरुणीवर २०१३ मध्ये बलात्कार केल्याचा आसाराम बापूवर आरोप होता. तर, या पीडित तरुणीच्या बहिणीवर आसारामचा मुलगा साई नारायण याने बलात्कार केल्याचा आरोप होता.

या प्रकरणात आसारामशिवाय,त्याचीपत्नी लक्ष्मी,मुलगी भारती आणि चार अनुयायी ध्रुवबेन,निर्मला,जस्सीआणि मीरा हे आरोपी होते. याप्रकरणाच्या सुनावणीसाठी आसाराम बापूला कोर्टात व्हर्च्युअली हजर करण्यात आले. सुनावणीनंतर कोर्टाने आसारामला दोषी ठरवले आहे. आधीच एका बलात्काराच्या प्रकरणात आसाराम बापू हा जोधपूरच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सूरत बलात्कार प्रकरणात आसारामबापूच्या पत्नीसह इतर सहाआरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या स्वयंघोषित संत आसाराम बापूच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. आसाराम बापू हा आणखी एका बलात्काराच्या प्रकरणाता दोषी आढळला आहे. गुजरातमधील गांधीनगर सत्र न्यायालयाने हा निकाल दिला असून उद्या आसाराम बापूला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

या आधी केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्याप्रकरणी जोधपूर येथील तुरुंगात आसाराम बापू जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टात त्याने जामीन अर्जही दाखल केला होता. मात्र, कोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळला होता.

काय आहे प्रकरण?

२०१३ मध्ये सूरतमधील एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आसाराम बापूवर लावण्यात आला होता. तर, या पीडित तरुणीच्या बहिणीवर आसारामचा मुलगा साई नारायण याने बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात आसारामशिवाय, त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा या आरोपी होता. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आसाराम बापूला कोर्टात व्हर्च्युअली हजर करण्यात आले. सुनावणीनंतर कोर्टाने आसारामला दोषी असल्याचे जाहीर केले. मात्र, शिक्षा उद्या, मंगळवारी सुनावणार असल्याचे जाहीर केले.