आझाद मैदानात लिंगायत समाजाचा महामोर्चा; ‘या’ मागण्यांसाठी मैदानात उसळला जनसागर

मुंबई ,२९ जानेवारी  / प्रतिनिधी :- मुंबईच्या आझाद मैदानामध्ये लिगायत समाजाचे आज महामोर्चाचे आयोजन केले. लिंगायत समाजाला धर्माची मान्यता मिळावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. तसेच, लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा, या मुख्य मागण्यांसह इतर काही मागण्या यावेळी राज्य सरकारसमोर मांडण्यात आल्या. विशेष म्हणजे, या पूर्वीही तब्ब्ल २० ते २२ मोर्चे या मागण्यांसाठी या समाजाकडून काढण्यात आले आहेत. मात्र, तरीही याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका यावेळी करण्यात आली.

महाराष्ट्रासह तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात मोर्चामध्ये लिंगायत समाजातील बांधव सहभागी झाले. लिंगायत समाजातील पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी समाजाला अल्पसंख्याक म्हणून स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी, यासाठी लोकप्रतिनिधींना निवेदने दिले होते. मात्र, अद्याप त्याची दखल न घेतल्याने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लिंगायत समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. मात्र अद्याप लेखी आश्वासन न मिळाल्याने लिंगायत समाज रस्त्यावर उतरला.