अदिती लोणीकरच्या अरंगेत्रमने प्रेक्षक मंत्रमुग्ध 

औरंगाबाद,२७ जानेवारी / प्रतिनिधी :-  विजेच्या चपळाईने होणारा पदन्यास, गणेशस्तोत्रसारख्या पुरातन स्तोत्रांच्या तालातूनही साकारणारे नृत्यशिल्प असा माहोल जमून आला होता अदिती लोणीकर या नृत्यांगनाच्या ‘अरंगेत्रम’प्रसंगी. 

कलाश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे नृत्यभूषण विक्रांत वायकोस यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यमचे शिक्षण घेणारी अदिती लोणीकर हिच्या अरंगेत्रम कार्यक्रम  शुक्रवारी रंगला. २७ जानेवारी रोजी सायंकाळी  एमजीएमच्या रुक्मिणी हॉल येथे आयोजित करण्यात आला होता .

कार्यक्रमासाठी  सहकार राज्यमंत्री अतुल सावे,प्रसिद्ध उद्दोजक मानसिंग पवार , सीएमआयचे माजी अध्यक्ष व उद्दोजक मुकुंद कुलकर्णी , सीएमआयएचे माजी अध्यक्ष व उद्दोजक प्रसाद कोकीळ,सरिता कुलकर्णी ,मनीषा कोकीळ  यांची उपस्थिती होती. रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आयोजक सतीश लोणीकर व सरिता लोणीकर यांनी सर्वांचे स्वागत केले. 

अदिती  सात वर्षांची असताना तिच्या आईवडिलांची भेट साधना विद्यालयाचे  विक्रम वायकोस  यांच्याशी झाली. त्यांनी संगीत, सूर, ताल याचा गंधही  नसणाऱ्या  अदितीला  भरतनाट्यम शिकविले. तिच्यावर अनेक प्रयोग करून अत्यंत कष्टाने तिला शिकविले. अदितीच्या  शरीरातच संगीत, सूर, ताल आहेत, हे लक्षात आल्यानंतर अरंगेत्रम झाले. तिच्या एकटीचे अडीच तासांचे नृत्य झाले. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. 

नृत्यशैलीमध्ये किमान सात वर्षे गुरूच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतल्यानंतर नृत्यशैली या सर्वासक्षम सादरीकरणाला अरंगेत्रम म्हटले जाते. हे नृत्य सादर करणे नृत्यांगनेच्या व गुरूच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा क्षण असतो. 

कार्यक्रमात ऊर्जाने हमसदवनी रागावर आधारित पुष्पांजली, अलारपू सहित गणेशवंदना, कल्याणी रागावर आधारित जतीस्वरम, भीमपलास रागावर आधारित देविस्तुती, श्री रागावर आधारित वर्णम बेहग रागावर आधारित नटराजपदम, यमनकल्याणी रागावर आधारीत कृष्णाकृती, हिदोलाम रागावर आधारित थिलाना व सौराष्ट्रम रागावर आधारित मंगलम या प्रकाराचे सादरीकरण केले. ऊर्जाच्या नृत्यात ताल व सुर व पदलालित्याचा सुरेख संगम या वेळी पाहायला मिळाला. 

(सर्व छायचित्रे -बसवराज जिभकाटे )