महा बँकेतील सर्व कर्मचारी तसेच अधिकारीच्या देशव्यापी संपाला चांगला प्रतिसाद:२ हजार शाखेत व्यवहार ठप्प 

औरंगाबाद,२७ जानेवारी / प्रतिनिधी :- आज महा बँकेतील सर्व कर्मचारी तसेच अधिकारी संघटनाचे सर्व सभासद प्रामुख्याने नोकर भरतीच्या प्रश्नावर एक दिवसाच्या देशव्यापी संपावर गेले आहेत.संपात सर्व संघटना सहभागी असल्यामुळे शाखांचे दरवाजे देखील उघडल्या गेले नाहीत संपामुळे जवळजवळ 2000 पेक्षा जास्त शाखातून रोखीचे अथवा चेक वटणावळीचे कुठलेच व्यवहार होऊ शकले नाहीत.

बँकेत पुरेशी नोकर भरती न केल्यामुळे एकीकडे कर्मचाऱ्यांना तणावाखाली काम करावे लागत आहे तर दुसरीकडे ग्राहकांना देखील अनेक असुविधांना तोंड द्यावे लागत आहे याचा बँकेच्या कामकाजावर देखील विपरीत परिणाम होत आहे.पण हस्तिदंती मनोऱ्यावर बसून काम करणाऱ्या व्यवस्थापनाला त्याची जाणीव नाही आणि झाली तरी ते जाणते पणी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

संघटनांच्या प्रतिनिधींनी चर्चेद्वारे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले तरीपण असंवेदनशील व्यवस्थापनाने आपले अडमुठे पणाचे धोरण तसेच कायम ठेवले म्हणून हा संप अखेर अटळ बनला.यानंतर संघटनांनी नऊ आणि दहा फेब्रुवारी रोजी दोन दिवसांची संपाची हाक दिली आहे मधल्या काळात संघटनांचे प्रतिनिधी या बँकांचा मालक असलेल्या भारत सरकारने यात हस्तक्षेप करावा आणि पुरेशी नौकर भरती करावी यासाठी बँकेला निर्देश द्यावेत अशी विनंती करत आहे.

औरंगाबाद येथे बँकऑफ महाराष्ट्र क्रांती चौक शाखा समोर निदर्शने करण्यात आली यामध्ये बँकेच्या व्यवस्थापनाच्या अडमुठे पणाच्या धोरणाविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. बँकेमध्ये पुरेशी नोकर भरती करण्या साठी मागणी करण्यात आली संघटनेचे कार्याध्यक्ष कॉ राजेंद्र देवळे यांनी मार्गदर्शन केले व एन ओ बी ओ अधिकारी संघटनेचे अजय बोरसे व गिरीश सुलताने तसेच ए आय बी ओ ए चे निलेश खरात यांनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॉम्रेड राजेंन्द्र मुंगीकर , प्रशांत कुलकर्णी, पियूष बिऱ्हाडे, शीला खरात यांनी प्रयत्न केले . श्रुतिका मोहोड यांनी आभार प्रदर्शन केले.