जेईई परिक्षा 2020 परीक्षा केंद्रांवर कलम 144 लागू

औरंगाबाद, दिनांक 01 : जेईई परिक्षा 2020 चे आयोजन दि. 1 ते 6 सप्टेंबर 2020 या कालावधीत सकाळी 8 ते 6 वाजेपर्यत ऑनलाईन पध्दतीने औरंगाबाद शहरातील ION DIGITAL ZONE,CHIKALTHANA NEAR CTR MANUFACTURING COMPANY MIDC   तसेच BYTEZ S INFORETCH,18 HEMKUNJ/SURANA NAGAR, JALNA ROAD AURANGABAD  या उपकेंद्रावर करण्यात आले आहे.

 या परीक्षा कालावधीत औरंगाबाद परिसरात कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी उपरोक्त परीक्षा केंद्रांवर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(3) अन्वये मनाई आदेश अंमलात राहील. तसेच परीक्षा सुरू असलेल्या कालावधीत संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस परीक्षाचे केंद्र असलेल्या ठिकाणच्या परिसरात प्रवेश करता येणार नाही.  तसेच परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरापासून एक कि.मी पर्यंतची सर्व झेरॉक्स केंद्रे चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच  या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीविरुध्द भारतीय दंड सहिता कलम 188 अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. वरिल आदेश जेईई परिक्षा 2020 च्या परिक्षा केंद्राच्या ठिकाणी 1 ते 6 सप्टेंबर 2020 या कालावधीत सकाळी  6 ते परिक्षासंपेपर्यत अमंलात राहिल  असे पोलिस उपायुक्त (मु.) औरंगाबाद शहर यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *