महाराष्ट्रातील ४ जवानांना होमगार्ड आणि नागरी संरक्षण राष्ट्रपती पदक जाहीर

नवी दिल्ली, दि. 25 : होमगार्ड (एचजी) आणि नागरी संरक्षण (सीडी)  सेवेमध्ये गुणवत्तापूर्ण  सेवेसाठी महाराष्ट्रातील  4 जवानांना “राष्ट्रपती पदक” आज जाहीर झाले आहेत.

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला होमगार्ड  आणि नागरी संरक्षणामध्ये  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जवानांना राष्ट्रपती यांच्या मंजूरीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून “राष्ट्रपती पदक” जाहीर केले जातात. यात राज्यातील 4 जवानांचा समावेश आहे.

होमगार्ड आणि नागरी संरक्षण पदक विजेत्यांची यादी पुढील प्रमाणे :

  • श्री काशिनाथ रडका कुरकुटे, सहायक उपनियंत्रक (सीडी)
  • श्री.  एकनाथ जगन्नाथ सुतार,  प्लाटून कमांडर (एचजी)
  • श्री. परमेश्वर केरबा जवादे, ऑफिसर कमांडिंग
  • श्रीमती मोनिका अशोक शिंपी, होमगार्ड