माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव झुंज अखेर अपयशी ठरली. लष्कराच्या रिसर्च अॅण्ड रेफरल रुग्णालयात त्यांनी ३१ ऑगस्टला अखेरचा श्वास घेतला. ते ८४ वर्षांचे होते. १० ऑगस्ट रोजी त्यांची प्रकृती बरी नसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र अखेर त्यांनी आज जगाचा निरोप घेतला. त्यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांनी याबद्दल ट्विटरवरून माहिती दिली. 

https://twitter.com/ABHIJIT_LS/status/1300407074560471041

प्रणव मुखर्जी यांना १० ऑगस्ट रोजी श्वसन संक्रमणामुळे दिल्लीतील लष्कराच्या रेफरल व संशोधन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तसेच उपचारादरम्यान त्यांना कोरोनाचीही लागण झाल्याचेही समोर आले होते. यासह त्यांच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला होता. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे एक पथक सातत्याने लक्ष ठेवून होते.

Image

प्रणव मुखर्जी हे भारताचे १३ वे राष्ट्रपती होते. त्यांनी २०१२ त २०१७ दरम्यान राष्ट्रपती पद भूषविले होते. राष्ट्रपतीपद भूषवण्याआधी २००९ ते २०१२ या काळात मनमोहन सिंग सरकारमध्ये त्यांच्याकडे केंद्रीय अर्थमंत्रीपदाची धुरा होती. इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात १९६९मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ‘प्रणवदा’ यांची राज्यसभेवर त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना ‘भारत रत्न’ पुरस्कारानेही सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. जवळपास ५ दशक भारतीय राजकारणात सक्रिय होते.

Image

हायकमांडमुळे तीनदा हुकले पंतप्रधानपद ! शिक्षक, क्लार्क ते राष्ट्रपती

प्रणव मुखर्जी… भारतीय राजकारणातील एक असे नाव ज्याचा विरोधकही सन्मान करतात. एक क्लार्क आणि एक शिक्षक, राजकारण आणि राष्ट्रपती बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अवघ्या देशाने पाहिला आहे. आपल्या राजकीय कारकीर्दीत तीन वेळा अशा संधी आल्या, तेव्हा वाटले होते की, प्रणवदा पंतप्रधान होतील. मात्र, ते तीनही वेळा या शर्यतीत मागे राहिले. त्यांच्या कार्यक्षमतेचा अंदाज माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या एका वाक्यातून येऊ शकतो. 

‘मी ज्यावेळी पंतप्रधान बनलो त्यावेळी माझ्यापेक्षा जास्त कार्यक्षम आणि सामर्थ्यवान असे व्यक्ती प्रणव मुखर्जी होते. परंतू मी काय करू शकत होतो. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी माझी या पदासाठी निवड केली होती.’ पंतप्रधानपदासाठी प्रणवदांचे तीनवेळा नाव पुढे आले होते. मात्र, सत्तेच्या पटावर चालताना पंतप्रधान पद काँग्रेसकडून त्यांना मिळू शकले नाही.

Image

१. इंदिरा गांधींच्या कॅबिनेटमध्ये क्रमांक दोनचे मंत्री मात्र, पंतप्रधान झाले नाहीत. 

१९६९ मध्ये इंदिरा गांधी यांच्या आग्रहाखातर प्रणवदा राज्यसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधी सरकारच्या रणनितींमध्ये महत्वाची भूमीका त्यांनी निभावली होती. त्यामुळेच त्यांची जागा कॅबिनेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होती. कॅबिनेटमध्ये आर. व्यंकटरामन, पी.व्ही. नरसिंम्हाराव, ज्ञानी जेहेल सिंह, प्रकाश संद सेठी आणि नारायण दत्त तिवारी, असे मातब्बर नेते होते. त्यातून प्रणवदांचे राजकीय वजन तेव्हापासून किती होते याचा अंदाज येईल. 

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधानपदाचा प्रमुख दावेदार म्हणून प्रणव यांचे नाव चर्चेत होते. मात्र, राजीव गांधींना पक्षाने निवडून दिले होते. डिसेंबर १९८४ मध्ये लोकसभा निवडणूका झाल्या, काँग्रेसला ४१४ जागा मिळाल्या. मात्र, कॅबिनेटमध्ये प्रणवदांना जागा मिळाली. कॅबिनेटमध्ये जागा मिळाली नाही त्यानंतर त्यांनी एका पत्रकात लिहीले होते. मी कॅबिनेटचा हिस्सा नाही हे मला आता समजले आहे, पण या धक्क्यातून मी सावरलो आणि पत्नीसह टीव्हीवर शपथग्रहण सोहळा पाहिला. दोन वर्षांनंतर १९८६ मध्ये प्रणवदांनी बंगालमध्ये राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्षाचे स्थापना केली. तीन वर्षांनी राजीव गांधींनी समजूत काढल्यानंतर त्यांनी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता. 

Image

२. दोन वर्षांनी पुन्हा पंतप्रधानपद हुकले

१९९१ मध्ये राजीव गांधींची हत्या झाली. निवडणूकीत काँग्रेसची सत्ता पुन्हा आली. त्यावेळी प्रणवदा पुन्हा पंतप्रधान होतील, या चर्चांना उधाण आले होते. त्यांच्या तुलनेत दुसरा कुठलाही चेहरा केंद्रात नव्हता. मात्र, यावेळीही पंतप्रधान पदाची संधी हुकली. नरसिंम्हा राव यांना पंतप्रधान बनवण्यात आले. प्रणवदांना पूर्वी योजना आयोग उपाध्यक्ष आणि त्यानंतर परराष्ट्र मंत्री खाते देण्यात आले.

३. २००४ मध्ये सोनिया गांधींनी पंतप्रधान पदासाठी डॉ. मनमोहन सिंहांची निवड केली.

Image

२००४ वर्ष उजाडले. काँग्रेसला १४५ जागा तर भाजपला १३८ जागा मिळाल्या. ही भाजपची हार मानण्यात आली होती. सोनिया गांधी स्वतः पंतप्रधान झाल्या असत्या मात्र, त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारणार नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर पुन्हा प्रणवदांचे नाव चर्चेत आले होते. मात्र, काँग्रेसने अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांची निवड केली. 

मनमोहन सिंहांच्या कॅबिनेटमध्येही दुसरा क्रमांक

२०१२ मध्ये मुखर्जी यांनी मनमोहन सिंह यांच्या कॅबिनेट दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री होते. प्रणवदांनी २००४ ते २००६ पर्यंत संरक्षण, २००६ ते २००९ पर्यंत परराष्ट्र आणि २००९ ते २०१२ पर्यंत अर्थमंत्रालय सांभाळले. या दरम्यान, लोकसभेचेही नेते होते. युपीए सरकारचे संकटमोचक, अशी ओळख बनली होती. २०१२ मध्ये पी.ए.संगमा यांनीही राष्ट्रपतीपदासाठी अर्ज केला होता. प्रणवदांना ७० टक्के मते मिळाली आणि ते राष्ट्रपती बनले. 

राजकारणात येण्यापूर्वी होते क्वार्क आणि शिक्षक

प्रणवदा भारतीय राजकारणातील एक विद्यान व्यक्ती म्हणून सन्मानित झाले. यापूर्वी इतिहास, राजशास्त्र, कायदे आदी विषयांची पदवी त्यांच्याकडे होते. क्वार्क, पत्रकार, शिक्षण म्हणून त्यांनी आपल्या आयुष्यात भूमिका बजावल्या होत्या. १९६९ मध्ये वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आले. २००८ मध्ये त्यांना पद्म विभूषण आणि २०१९ मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन गौरवण्यात आले होते.

Image
माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान म्हणाले, “भारतरत्न  प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल भारत शोक व्यक्त करत आहे.  त्यांनी आपल्या राष्ट्राच्या विकासाच्या मार्गावर एक अमिट छाप सोडली आहे. ते एक उच्च दर्जाचा विद्वान , एक उत्कृष्ट राजकारणी होते आणि राजकीय क्षेत्रात तसेच समाजातील सर्व घटकांसाठी ते आदरणीय होते.

अनेक दशकांच्या राजकीय कारकीर्दीत प्रणव मुखर्जी यांनी  आर्थिक आणि धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाच्या मंत्रालयांमध्ये दीर्घकाळ योगदान दिले.  ते एक उत्कृष्ट संसदपटू होते, त्यांची अभ्यासपूर्ण तयारी असायची, ते उत्कृष्ट वक्ते होते आणि त्यांना विनोदाचे उत्तम अंग  होते.

भारताचे राष्ट्रपती म्हणून  प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवन सामान्य नागरिकांना अधिक खुले करून दिले.  त्यांनी राष्ट्रपती भवन  शिक्षण, संशोधन , संस्कृती, विज्ञान आणि साहित्य यांचे केंद्र बनविले. प्रमुख धोरणात्मक बाबींविषयी त्यांचे सुज्ञ मार्गदर्शन मी कधीही विसरणार नाही.

2014 मध्ये मी दिल्लीत नवीन होतो. पहिल्या दिवसापासूनच मला प्रणव मुखर्जी यांचे मार्गदर्शन, पाठिंबा आणि आशीर्वाद मिळाला. त्यांच्याबरोबर माझा संवाद माझ्यासाठी नेहमीच आनंददायी होता.  त्यांचे कुटुंब, मित्र, प्रशंसक आणि देशभरातील समर्थकांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *