वैजापूर शहरात शिंदे-भाजप व ठाकरे गटातर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

वैजापूर ,२३ जानेवारी / प्रतिनिधी :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने सोमवारी (ता.23) शहरात शिंदे-भाजप गट व ठाकरे गटातर्फे अभिवादनाचा कार्यक्रम झाला. 

शिंदे गटाचे आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. ठाकरे गटातर्फे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्या संपर्क कार्यालयात तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे यांच्या गावी महालगांव येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादानाचा कार्यक्रम झाला.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आ. बोरणारे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते मा.नगराध्यक्ष साबेरभाई, खुशालसिंग अंकल राजपूत, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, खरेदी विक्री संघाचे चेअरमन साहेबराव औताडे, बाजार समितीचे माजी उपसभापती विष्णू भाऊ जेजुरकर, पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, तालुकाप्रमुख राजेंद्र साळुंके, अनिल पाटील चव्हाण, शहरप्रमुख पारस घाटे, माजी उपसभापती राजेंद्र चव्हाण, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख पद्माताई साळुंके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी उपतालुकाप्रमुख कल्याण जगताप, सलीम वैजापूरी, नानासाहेब धोत्रे, महेश बुणगे, नगरसेवक डॉ. निलेश भाटिया, ज्ञानेश्र्वर टेके, बिलाल सौदागर, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत साळुंके, विभागप्रमुख नानासाहेब थोरात, उपविभागप्रमुख हरिभाऊ साळुंके, बंडू गायकवाड, सुनील कारभार, ॲड. नानासाहेब  जगताप, रावसाहेब मोटे, राजूभाऊ राजपूत, शंकर  मुळे, वसंत त्रिभुवन, डॉ. संतोष गंगवाल, किसनराव जाधव, रामभाऊ बारसे, विजय मगर, परसराम मोईन, बाळासाहेब जाधव, अशोक शिंदे, वल्लभ सोनवणे, निखिल वाणी, सुनील वाळुंज, योगेश गायकवाड संतोष वाघ, संजय पा बोरनारे, रणजीत चव्हाण, योगेश इंगळे, कमलेश आंबेकर, अमोल बोरणारे, प्रतीक बोरणारे, संतोष बंगाळ, रामभाऊ त्रिभुवन, दौलत गायकवाड, सचिन गडाख, ईश्वर जानराव, नंदू ढगे, दिलीप भांडे, राजू त्रिभुवन, अशोक साळुंके, श्याम साळुंके, अतुल कुंदे आदी उपस्थित होते.

तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे झालेल्या अभिवादनाच्या कार्यक्रमास माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, उपजिल्हाप्रमुख संजय पाटील निकम, तालुकाप्रमुख सचिन वाणी, प्रशांत शिंदे आदींची उपस्थिती होती.