वैजापुरात कॅन्सर रुग्ण तपासणी शिबिराला प्रतिसाद

साई माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वैजापूरचा उपक्रम

वैजापूर ,२३ जानेवारी / प्रतिनिधी :- साई माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वैजापूरतर्फे आयोजित कॅन्सर रुग्ण तपासणी शिबिराला सोमवारी (ता.23) येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराला जे.के.जाधव विकास मंच व असहाब -ए-रसूल संस्थेचे सहकार्य लाभले.

एक लढा कॅन्सर विरोधात, “उम्मीद एक किरण की जगाए महाराष्ट्र को कॅन्सर मुक्त कराए” “होय” कॅन्सर वर विजय मिळविता येतो. आधुनिक तंत्रज्ञानाने वेळीच निदान व तात्काळ उपचार म्हणजेच कॅन्सर वर विजय असा संकल्प करीत शहर व तालुक्यातील पहिलेच कॅन्सर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील ठक्कर बाजार परिसरात आयोजित या शिबिराचे उदघाटन आ.रमेश पाटील बोरणारे, नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, जे.के.जाधव, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, डॉ.दिनेश परदेशी, मुख्याधिकारी भागवत बिघोत प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.आशिष पाटणी व आंतरराष्ट्रीय कॅन्सर तज्ज्ञ डॉ.आस्फिया अक्रमखान, प्रशांत कंगले यांच्याहस्ते झाले. शिबिरात शहर व तालुक्यातील कॅन्सर रुग्णांची तपासणी व योग्य प्रबोधन करण्यात येऊन त्यांना योग्य उपचार देण्यात आले. या स्थळीच कॅन्सर केंद्राचे उदघाटन ही करण्यात आले. प्रथम धन्वंतरी पूजन व भारताचे सेनानी, आझाद हिंद सेनेचे सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्र संचलन ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले.  कॅन्सरच्या समूळ उच्चाटनसाठी हे शिबीर आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी साई माऊली सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र काटकर, सचिव राम उचित, श्याम उचित, मनोज गायकवाड, हरीश लालसरे, अमोल गोरक्ष, अशोक पवार, भरत गायकवाड, गोठू बसवेकर, शेख जाफर, शेख अतिक, फेरोजखान, अण्णा वैद्य, साजिद पटेल, सतीश वानखेडे, मुखतार शेख, मोहम्मद यासीन यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी नगरसेवक गणेश खैरे, पारस घाटे, बिलाल सौदागर, पंकज ठोंबरे, चांगदेव उघडे, दौलत गायकवाड, पद्माताई साळुंके, श्रीकांत साळुंके, विजय पाटील, बाबासाहेब जगताप, दशरथ बनकर, अंजली खंडागळे यांची उपस्थिती होती. धुत हॉस्पिटल, गेबस फौंडेशन, शासकीय कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. शेख अफसर, डॉ.एम.डी.संकपाळ, डॉ.श्रद्धा घडामोडे, डॉ.मनीषा जाधव यांनी रुग्ण तपासणी केली. शेवटी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र काटकर यांनी आभार मानले.