वैजापूर येथे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात भाजपची बैठक

वैजापूर ,२२ जानेवारी / प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीची शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी नियोजन पूर्व बैठक येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे भाजपचे जिल्हाध्यक्ष  विजयराव औताडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदेश कार्यकारणी सदस्य एकनाथ जाधव, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, प्रशांत कंगले, सुरेश तांबे, डॉक्टर राजीव डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत आ.हरिभाऊ बागडे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सूक्ष्म नियोजनाच्या जोरावर व  कार्यकर्त्याच्या कठोर परिश्रमावर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार किरण पाटील हे विजय निश्चित होतील यात काही शंका नाही. भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराव औताडे म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात  शिक्षकांना व शाळांना 1160 कोटी रुपयाचे तुकडी वाढ व शिक्षक समावेश यासाठी तात्काळ मंजूर करून शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावला. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षकांचे घर भाडे थांबले आहे ते तात्काळ सुरू करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तात्काळ निर्णय घेणार आहेत. असे सांगून कार्यकर्त्यांनी सूक्ष्म नियोजन करावे आणि एक एक मत महत्त्वाचे आहे. ते मतपेटीत आणावे असे मनोगत व्यक्त केले.

     यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक दिनेश राजपूत, गोकुळ भुजबळ, गणेश खैरे जिल्हा परिषद सदस्य सुनील पैठणपगारे , डॉक्टर डांगे, पंचायत समिती सदस्य सुरेश राऊत, नितीन जोशी, शैलेश पोंदे, प्रेम राजपूत, ज्ञानेश्वर इंगळे, साळुंके सर, जितू पवार, अनिल सोनवणे यांच्यासह भाजपाचे  कार्यकर्ते व  पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.