आई -वडिलांची मनोभावे सेवा करावी त्यांची हेळसांड करू नये:देवकीनंदन ठाकुरजी महाराज

वैजापूर येथे सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेस भाविकांची मोठी गर्दी

वैजापूर ,२२ जानेवारी / प्रतिनिधी :- शहरातील जीवनगंगा वसाहतीत गेल्या 20 जानेवारीपासून हिंदी भाषेतून श्रीमद भागवत कथा सोहळा सुरू असून प.पु. देवकीनंदन ठाकुरजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीमद भागवत कथा ऐकण्यास भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

या विश्वातील ज्या व्यक्तीवर परमेश्वराची कृपा होते त्या व्यक्तीवर जगाची कृपा होते यासाठी प्रत्येकाने परमपिता परमेश्वर यांच्यावर शुध्द मनाने श्रद्धा ठेवावी व स्वतः बरोबर कुटुंब व समाजाचे कल्याण साधावे. असे अमृत वचन भागवताचार्य श्री.देवकीनंदन ठाकुरजी महाराज यांनी रविवारी (ता.22) येथील जीवनगंगा वसाहतीत आयोजित श्रीमद भागवत कथा सोहळ्यात केले.

ते पुढे म्हणाले की चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते,आई -वडिलांची मनोभावे सेवा करावी त्यांची हेळसांड करू नये,वृद्धापकाळात त्यांची सेवा करावी, भागवत कथा श्रवण करून त्यातून जीवनाला विधायक व रचनात्मक कार्याकडे न्यावे असेही ते पुढे म्हणाले.

याप्रसंगी सायंकाळच्या आरती समयी आ.रमेश पाटील बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील  चिकटगावकर, नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक कृष्णा पाटील डोणगावकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माजी अध्यक्षा देवयानी डोणगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ आदींनी आज हजेरी लावली.

कार्यक्रम समिती अध्यक्ष राजू राजपूत,भावलाल  सोमासे, गणेश खैरे, सचिव प्रेम राजपूत, सम्राट तांबूस, कैलास पवार, अशोक पवार, सोनू राजपूत, मनोज राजपूत, योगेश राजपूत, किरण राजपूत, प्रमोद राऊत, मनीषा राजपूत, वर्षा राजपूत, शीतल राजपूत, दुर्गा राजपूत, मीना राजपूत, रेणू राजपूत याही सहकार्य करीत आहेत. सूत्र संचलन धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले तर आभार प्रेम राजपूत यांनी मानले.