मान​सि​क आजार व व्यसनाधीनता या विषयांवर जनजागृती पर वाहनाचा उदघाटन समारंभ ​शुक्रवारी ​

औरंगाबाद,१८ जानेवारी / प्रतिनिधी :-डॉ. कादरी मानसिक आरोग्य केंद्र पडेगाव औरंगाबाद व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय, चिकलठाणा, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मानसिक आजार व व्यसनाधीनता या विषयांवर जनजागृती पर उपक्रम ​आयोजित करण्यात आला आहे​. त्यासाठी जनजागृतीपर वाहनाचा उदघाटन समारंभ २० जानेवारी शुक्रवार रोजी संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी डॉ. महानंदा मुंढे (उपसंचालक आरोग्य सेवा) यांच्या हस्ते होणार​ आहे.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती डॉ. भूषणकुमार रामटेके (सहाय्यक संचालक, औरंगाबाद), डॉ. दयानंद मोतीपवळे (जिल्हा शल्यचिकित्सक) व डॉ. सुधाकर शेळके (जिल्हा आरोग्य अधिकारी) डॉ. जितेंद्र डोंगरे (मनोविकार तज्ज्ञ), डॉ. जगदीश टेकाळे (मनोविकार तज्ज्ञ), डॉ. गजानन कबले(मनोविकार तज्ज्ञ) यांची असणार आहे.

​या ​ कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अझीझ अहमद कादरी(मनोविकार तज्ज्ञ) व डॉ. मेराज कादरी(मनोविकार तज्ज्ञ), डॉ. सना खिलजी(मनोविकार तज्ज्ञ), डॉ.फैसल खिलजी(मनोविकार तज्ज्ञ), डॉ. हसीब फारुकी(मनोविकार तज्ज्ञ), डॉ. प्रफुल्ल वायकोस(मनोविकार तज्ज्ञ), विजय सोनोने(सायकॉलॉजिस्ट) यांनी केले आहे.