कार्यक्रमाला दीपप्रज्वलन करताना सुप्रिया सुळेंच्या साडीला लागली आग; कोणतीही इजा नाही

पुणे,१५ जानेवारी / प्रतिनिधी :-पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये दीपप्रज्वलन करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागली. सुदैवाने, त्यांना या अपघातामध्ये कोणतीही दुखापत झाली नसून त्यांनी पुढचा कार्यक्रम चालूच ठेवला. यावेळी त्यांनी इतरांनाही अशा कार्यक्रमांमध्ये अशा घटना घडू शकतात, त्यामुळे काळजी घेण्याचे आव्हान केले आहे.

हिंजवडीमधील एका कराटे क्लासच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येत होते. यावेळी अनावधानाने त्यांच्या साडीला आग लागली. प्रसंगावधान राखत त्यांनी त्वरित ती आग विजवण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यामध्ये त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. याउलट त्यांनी कार्यक्रम चालू ठेवण्यास सांगितला. विशेष म्हणजे आज त्यांचे पुण्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आहेत. तर, या घटनेनंतर त्या जळलेल्या साडीसह पुढील कार्यक्रमाला रवाना झाल्या.