वैजापूर येथे विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

वैजापूर ,१४ जानेवारी / प्रतिनिधी :-मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ होऊन 14 जानेवारी 2023 रोजी 29 वर्षे झाली असून या नामविस्तार दिनानिमित्त शनिवारी (ता.14) शहरातील सर्व थरातील नागरिकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जमा होऊन “नाम विस्तार दिनाचा विजय असो अशा घोषणा देत डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नामविस्तार दिन साजरा केला.

सर्वप्रथम नगराध्यक्ष शिल्पाताई दिनेश परदेशी यांनी डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. नगरसेवक दशरथ बनकर, नगरसेवक राजेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, ऍड. सचिन जानेफळकर, समता परिषदेचे आबासाहेब जेजुरकर, प्रा. प्रमोद पठारे, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील त्रिभुवन, कैलास भाटे, राहुल त्रिभुवन, मेघराज त्रिभुवन, जालिंदर बनकर, सुनील पवार, चंद्रसेन भोसले, अशोक साळवे, विठ्ठल भालेराव, सलीम तांबोळी, विजय दिवेकर, सतीश त्रिभुवन, ज्ञानेश्वर सिरसाट, बाळू त्रिभुवन, श्री. शिंदे, बाळा त्रिभुवन तसेच वैजापूर मराठी पत्रकार संघाच्यावतीने ही नामविस्तार दिन निमित्त सुनील त्रिभुवन ,दीपक बरकसे  यांनी अभिवादन केले. सूत्रसंचलन करून आभार राजेश गायकवाड यांनी मानले.