वैजापूर तालुक्यात 25 पैकी 18 ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांची बिनविरोध निवड ; आठ ग्रामपंचायतीत महिलांचा डंका

वैजापूर ,१४ जानेवारी / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींचे सदस्य व सरपंचांनी थेट जनतेतुन निवड करण्यासाठी 18 डिसेंबर रोजी निवडणुक झाली होती. या ग्रामपंचायतींचे उपसरपंच निवडण्यासाठी येथील तहसिल कार्यालयात शुक्रवारी ता.13) निवडणुक प्रक्रिया राबवण्यात आली. यात 25 पैकी अठरा ग्रामपंचायतींचे उपसरपंच बिनविरोध निवडुन आले तर उर्वरित सात ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदासाठी चुरशीची निवडणुक झाली.‌ आठ ग्रामपंचायतीत महिलांची उपसरपंच म्हणुन निवड झाली आहे. 

बिनविरोध निवडुन आलेले उपसरपंच पुढीलप्रमाणे: रेखा राजेंद्र शिनगारे (अव्वलगाव-हमरापूर) गोपीनाथ ज्ञानदेव गायकवाड (बेलगाम), भग्गाव (शरद कचरु काळे), रुपाली किरण राशिनकर (डाग पिंपळगाव), वेणुनाथ नारायण फाळके (हनुमंतराव), भाऊसाहेब बाळा निकम (हिंडणे कन्नड), इस्माईल सुलेमान सय्यद (हिलालपुर-कोरडगाव), दादासाहेब चांगदेव मगर (कोल्ही), शिल्पा दादासाहेब त्रिभुवन (खिर्डी-हरगोविंदपूर), शितल राहुल आल्हाट (महालगाव), आण्णा भाऊसाहेब मालकर (माळीघोगरगाव), योगेश केशव घंगाळे (नांदुरढोक-बाभुळगावगंगा), संदिप मगनराव गायकवाड (पानवी बुद्रुक-वक्ती), विशाल जगन्नाथ शेळके (पाराळा), दत्तात्रय जगन्नाथ ठोंबरे (पुरणगांव), धिरजकुमार गंगाराम सिंग राजपूत (रोटेगाव), अजय आसाराम साळुंके (टुणकी-दसकुली), तारा सुरेश तांबे (तिडी-मकरमतपुरवाडी). दरम्यान, सविता शांतवन त्रिभुवन (बाबतरा), सुमनबाई सुखदेव पवार (गोळवाडी-मिरकनगर), कृष्णा प्रकाश धारबळे (कनकसागज), नवनाथ विठ्ठल निमसे (कविटखेडा-बिरोळा), प्रियंका योगेश साळुंके (खरज-तित्तरखेडा), शेख नसिर कासम (नादी) व जावेद कडु सय्यद ( वांजरगाव ग्रा.पं) हे उमेदवार आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत निवडणुकीत विजयी झाले.

पारळाच्या उपसरपंचपदी विशाल शेळके यांची बिनविरोध निवड

वैजापूर तालुक्यातील पारळा गावाच्या उपसरपंचपदी विशाल शेळके यांची बिनवरोध निवड झाली. या अगोदरही दोन वेळास पाराळा गावची धुरा शेळके यांनी सांभाळली आहे. नवनिर्वाचित सरपंच कल्पना गणेश आहेर यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग बोलवण्यात आली होती. ग्रामपंचायतचे सदस्य गोरख आहेर, पूजा दत्तु जगताप, सुवर्णा प्रकाश घुगे, अलकाबाई शांताराम ठाकरे व निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक जाधव, तलाठी विकास महाजन व श्री.पेहरकर होते. 

या प्रसंगी बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप, कैलास नामदेव आहेर, गोरख आहेर, बाबासाहेब बावके, कैलास पवार, नवनाथ आहेर, दिलीप जगताप, गणेश आहेर, बाळू सांगळे, रोहित आहेर, दिपक आहेर, नेमीचंद सोनवणे, अशोक पवार, संजय बावके, संभाजी सूरासे, प्रकाश घुगे, नारायण सोनवणे, ज्ञानेश्वर बावके, सचिन सोनवणे, दादासाहेब बावके, ज्ञानेश्वर आहेर, लहानु ठाकरे, महादू मोरे, भाऊलाल पवार, राजू सोनवणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.