परभणीत १६ व्यापारी पॉझिटीव्ह

परभणी,
परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने रविवारी दिनांक 30 रोजी शहरातील 14 सेंटरवर 165 व्यापा-यांची रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यात 149 निगेटीव्ह तर 16 पॉझिटीव्ह आले.
कल्यान नगरातील आयएमए हॉल येथे 18 जणांची तपासणी करण्यात आली यात 8 पॉझीटीव्ह आढळले. नानलपेठ येथील बाल विद्या मंदिर सेंटरवर 45 जणांची तपासणी करण्यात आली. तेथे 7 जण पॉझीटीव्ह  आढळले. महानगरपालिका रुग्णालयात 12 जणांची तपासणी करण्यात आली तेथे 1 जण पॉझिटीव्ह आढळला.
सीटी क्लब येथे 6, औषधी भवन येथे 25, नुतन विद्यालय येथे 29, साखला प्लॉट येथील मनपाच्या आरोग्य केंद्रात 2, मार्केट येथे 28 जणांची तपासणी करण्यात आली. जागृती मंगल कार्यालय निरंक, अपना कॉर्नर येथील वाचनालय निरंक, कोठारी कॉम्प्लेक्स निरंक, खानापूर येथील आरोग्य केंद्र निरंक, खंडोबा बाजार येथील आरोग्य केंद्र निरंक, इनायत नगर येथील आरोग्य केंद्र निरंक, बॅटमिंटन हॉल येथे संख्या निरंक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *