महालगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी ठाकरे गटाच्या शीतल आल्हाट यांची बिनविरोध निवड

औरंगाबाद ,१३ जानेवारी/प्रतिनिधीः-वैजापूर तालुक्यातील महालगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवडणूक शुक्रवारी (ता.13) बिनविरोध पार पडली. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या  शितल राहुल आल्हाट यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. 

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती अविनाश पाटील गलांडे यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले. या प्रसंगी ठाकरे गटाचे  उपतालुकाप्रमुख डॉ.प्रकाश पाटील शेळके, सरपंच रोहिणी नानासाहेब काळे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश आल्हाट,सुधाकर गलांडे, मधुकर शेळके, लताताई हुमे, सोनमताई अल्हाट, सत्यभामाबाई मतकर, लिलाबाई अल्हाट ,रूपालीताई जाधव, देविदास जाधव, पुंजाराम काळे, चार्लस आल्हाट, कैलास शेळके, राजेंद्र हुमे, राऊसाहेब आल्हाट, सुनील आल्हाट, नामदेव आल्हाट, नवनाथ गायकवाड, हरिभाऊ आल्हाट, राजू गलांडे, अमोल मलिक, विजू आल्हाट, बाळू बुट्टे, तुकाराम आहेर, गणेश शेळके, भाऊसाहेब बोचरे, भानुदास इंगोले, मच्छिंद्र आल्हाट, राहुल गायकवाड, संपत जाधव, सतीश आल्हाट, शिवलाल गायकवाड, उमेश आल्हाट, राहुल गायकवाड, प्रकाश हूमे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.