वैजापूर आगारात सुरक्षितता अभियान अंतर्गत बस चालक -वाहकांसाठी प्रबोधन मेळावा

वैजापूर ,११ जानेवारी / प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या वैजापूर एसटी आगराच्यावतीने बुधवारी (ता.13) सुरक्षितता अभियानअंतर्गत ‘सडक सुरक्षा -जीवन रक्षा’ याविषयी बस चालक, वाहक व यांत्रिक कामगार यांच्या प्रबोधनार्थ मेळावा संपन्न झाला.

25 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या अभियानाचे उदघाटन तहसीलदार राहुल गायकवाड, विजय नरवडे, मनोज पाटील, धोंडीरामसिंह राजपूत व आगार व्यवस्थापक एच.बी.नेरकर यांच्याहस्ते झाले. प्रास्ताविक करून पाहुण्यांचे स्वागत श्री. नेरकर यांनी केले. रस्त्यावर बस चालविताना घायव्याची खबरदारी, प्रवाशी सुरक्षा, चालक, वाहक यांच्या मन स्वास्थ्य बाबत मार्गदर्शन, डोळ्यांची निगा, प्रवाशांची काळजी घेणे, वाहन काळजीपूर्वक चालविणे, बस चालविताना मोबाईल वापर टाळणे, व्यसन टाळणे, दिव्यांगाना सहाय्य करणे याबाबत तहसीलदार राहुल गायकवाड व राजपूत यानी मार्गदर्शन केले. शेवटी सर्व वाहक व चालक यांनी प्रवाशी सुरक्षा, रस्ते सुरक्षाबाबत शपथ घेतली.याप्रसंगी पोलीस स्टेशन गोपनीय शाखेचे श्री. घोटकर, तहसीलचे संतोष जाधव, श्री. गायकवाड  उपस्थित होते. एसटी महामंडळाचे  पी.डी.रामटेके, बी.के.गरुड, वाहतूक निरीक्षक एस.जे.पवार, पी.एच. सोनवणे, जे.बी.कोकाटे, एल.के.साळुंके, आर.एस. मुळे, वाहन परीक्षक यु.एफ. कलमबे, पी.एल. जाधव, पी. आर.विसपुते यांच्यासह चालक,वाहक व कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचलन बी.के.गरुड यांनी केले. आभार आर.एस. मुळे यांनी मानले.