आम्ही जमिनीवर चालणारे लोक; हवेत कोण.., फडणवीसांचे पवारांना चोख प्रत्युत्तर

औरंगाबाद, ८ जानेवारी  / प्रतिनिधी :-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेचा चांगलाच समाचरा घेतला आहे. सत्ता आल्यानंतर नेत्यांनी जमिनीवर राहिला पाहिजे. मात्र काही जण टोकाची भूमिका घेतात, हवेत उडतात असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. शरद पवार यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आम्हाला आमची जमीन माहिती आहे, आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. नेमकं हवेत कोण आहे हे तपासलं पाहिजे, असा टोला फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जोरदार टोला लगावला आहे.  आम्हाला आमची जमीन माहिती आहे, आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. नेमकं हवेत कोण आहे हे तपासलं पाहिजे असा टोला फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला आहे. तसेच त्यांनी संजय राऊत यांनी सामनामधून केलेल्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलं आहे. सामना हा आता पेपर राहिला नाही. मी तो वाचत नाही, असं म्हणत फडणवीसांनी राऊतांना खोचक टेला लगावला आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सीमावादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. सीमा वादावर आमचं सरकार फार गंभीर आहे. या प्रकरणात हरिष साळवे यांची नियुक्ती करण्याचा विचार आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या संपर्कात असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.