शिजान खानच्या जामीन याचिकेवरील सुनावणी स्थगित

वसई न्यायालयात सोमवारची मिळाली तारीख

वसई,७ जानेवारी/प्रतिनिधीः- तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्या प्रकरणी वसई न्यायालयाने अभिनेता शिजान मोहम्मद खान याच्या जामीन अर्जावरील सुनावणी स्थगित केली. त्याच्या अर्जावर आता ९ जानेवारी रोजी सुनावणी होईल.

वकील म्हणाला की, “सत्य आणि न्यायाचा विजय होईल. आमचा न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे. मी पुन्हा म्हणतो की, शिजान खान निर्दोष असून पोलिसांच्या हलगर्जीपणाची किमत तो व त्याचे कुटुंबीय मोजत आहेत. अटक करण्याच्या अधिकाराचा त्यांनी गैरवापर केला आहे.

शिजान दुसऱ्या सिक्रेट गर्लफ्रेंडशी बोलत होता

ताज्या अहवालानुसार पोलिसांनी शिजान व त्याची सिक्रेट गर्लफ्रेंड’ यांच्यातील चॅटला रिट्रीव्ह केले गेले आहे. शिजान हा अनेक मुलींशी बोलत होता, असे त्यातून स्पष्ट झाले. एएनआयच्या अहवालात म्हटले आहे की, तपासात आरोपीच्या मोबाईल फोनवर अनेक महत्वाच्या चॅटस मिळाल्या आहेत. त्यातून हा खुलासा झाला की, आरोपी ब्रेकअपनंतर तुनिषापासून दूर राहू लागला होता. तुनिषा त्याला वारंवार मैसेज करत होती. परंतु, आरोपीने या संदेशांना उत्तर देणे टाळले.

कुटुंबियांनी घेतली पत्रकार परिषद

गेल्या सुनावणीत शिजान खान याला १४ दिवसांच्या कोठडीत ठेवले गेले  होते. २ जानेवारी रोजी शिजान खानच्या कुटुंबियांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिजान खानच्या कोणत्याही सिक्रेट गर्लफ्रेंड’ च्या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले. शिजानची बहीण फलक हीदेखील समाजमाध्यमांत तुनिषा-शिजान यांच्या ब्रेकअपवर सविस्तर बोलली आहे. तिने व्हिडिओत म्हटले की, दोघांनी आपापसातील सहमतीने ब्रेकअप करून घेतला होता आणि ते सध्या आपल्या करियरवर लक्ष देऊ इच्छित होते.

अभिनेत्री तुनिषा (२०) हिने २४ डिसेंबर रोजी आत्महत्या केली. तिच्या आईने शिजानवर आत्महत्येला भाग पाडल्याचा आरोप करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला.