औरंगाबादमधील विशेष मुलांनी घेतला पक्षी निरीक्षणाचा आनंद

औरंगाबाद,७ जानेवारी  / प्रतिनिधी :- निसर्ग मित्र मंडळा तर्फे आरंभ ऑटीझम सेंटरच्या विशेष मुलांसाठी  फोटोग्राफी व पक्षी निरीक्षण कार्यशाळा मंगळवार दिं 13 डिसेंबर रोजी येथील सुखना जलाशयावर आयोजित  करण्यात आली होती.

इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमासनिसर्ग मित्र किशोर गठडी यांनी विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शन केले पक्षी मित्र किरण परदेशी यांनीही विद्यार्थ्यांना पक्ष्याची ओळख करून दिली.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सुखना परिसरात दिसणारे अनेक स्थानिक तसेच प्रवासी विविध रंगी पक्ष्याचे निरीक्षण व ओळख करून घेताना सर्वच विध्यार्थी हर्षुल्हासित झाले होते.

मुल नक्की ह्यातून शिकतील व ते त्यांना पुढच्या जीवनासाठी उपयोगात येईल हाच हेतू ह्या सगळ्याचा मागचा  होता असे आरंभच्या संचालिका  अंबिका  टाकळकर ह्यांनी या प्रसंगी सांगितले 

कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी आरंभ शाळेच्या शिक्षक व इतर कर्मचारीप्रज्ञा देशपांडे, गोपाळ देशमुख , विजायश्री जाई बहार, अश्विनी वांढेकर, शोयब शेख, चंद्रकला मिसळ आदी नी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमात सिध्देश् रेवलकर , किरण जोशी, साद शेख, दानिश शेख, प्रसाद गायके,  आर्यन, नैतिक जैस्वाल , श्रिजीत कानु, विराज ,शौर्य , कार्तिक, परम अंबिलवादे, आस्था, अर्चना, विक्रम तोर , संदीपान, श्री कदम , श्रीहरी टाकळकर , वैष्णवी जयपुरकर, दीपक शर्मा आदी विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते.या अंतर्गत मुलांनी विविध स्थानिक व परदेशी पक्षी जवळून निरीक्षण केले.