शीख धर्मीय आनंदाने साजरा करतात गणेशोत्सव

औरंगाबाद , दि. २९ ऑगस्ट – गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत अन जगभरात गणपती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात. औरंगाबादमध्ये स्वर्गीय संतसिंग ग्रंथी यांचे कुटुंबीय वर्षोनुवर्षे आपल्या घरात गणेशोत्सव मोठ्या आनंदाने बसवतात. १९७३ ला गणेश महासंघाच्या सुवर्ण मोहत्सवी वर्षात ते गणेश महासंघाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून उपकार गणेश मेळा, धुमधडाका गणेश मेळा, गणेश मंडळे आदींच्या माध्यमातून संतसिंग ग्रंथी हे गणेश महासंघात सक्रिय होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याहस्ते न चुकता दरवर्षी हे कुटुंबिय महाआरती करतात. संतसिंग ग्रंथी यांचे इंदरपाल, जसपाल आणि प्रितपाल ग्रंथी या मुलांनी आपल्या पिढीला हीच परंपरा पुढे  नेण्यासाठी शिकवण दिली आहे.गणेश महासंघाच्या सुवर्ण मोहत्सव वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू असल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *