वैजापुरात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरुध्द पोलिसांची कारवाई ; 8500 रुपयांचा मांजा जप्त

खबरदार जर नायलॉन मांजा विक्री कराल तर गाठ पोलिसांशी आहे .. पोलिस निरीक्षक राजपूत 

वैजापूर ,​७​ जानेवारी  / प्रतिनिधी :-उच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्याविरुध्द वैजापूर पोलिसांनी मोहिम उघडली असून अवैधरित्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या चेतन प्रकाश हिरण (वय 27 वर्ष, रा. भाटिया गल्ली वैजापूर)) यास पोलिसांनी शुक्रवारी (ता.06) ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,शहरातील येवला रोड वर असलेल्या भाजी मंडई जवळ अवैधरित्या नायलॉन मांजाची विक्री करत आहे अशी पोलीस उपनिरीक्षक रजाक शेख यांना मिळाली.या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकत 8500 रुपये किमतीचा मोनो काईट नावाचा अवैध नायलॉनचा मांजा साठा जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उपनिरीक्षक रज्जाक शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून   पुढील तपास सुरू आहे.