वेणूगोपाल धूत यांची याचिका सीबीआय न्यायालयाने फेटाळली

आयसीआयसीआय बँकेचे कर्ज प्रकरण

मुंबई, ६ जानेवारी/प्रतिनिधीः- विशेष केंद्रीय अन्वेषण विभाग न्यायालयाने (सीबीआय) व्हिडिओकॉन ग्रुपचे प्रवर्तक वेणूगोपाल धूत यांनी त्यांच्या अटकेला दिलेली आव्हान याचिका गुरूवारी फेटाळली. आयसीआयसीआय बँकेच्या कर्ज घोटाळ्यात धूत यांना अटक झालेली आहे.

लड्डा म्हणाले की, वेणूगोपाल धूत यांना दबाबाखाली अटक करण्यात आली असून अटक झाल्यापासून ते चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात गेले होते. त्यामुळे चौकशीपासून त्यांनी दूर जाण्याचा प्रश्नच नाही, असे हस्तलिखित याचिकेत म्हटले आहे. २५ डिसेंबर रोजी धूत यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावले होते तरी ते तपास अधिकाऱ्यासमोर हजर होऊ शकले नाही कारण ते औरंगाबादेत रुग्णालयात दाखल होते. सहकार्य करीत नसल्याबद्दल दुसऱ्या दिवशी त्यांना अटक करण्यात आली, असेही याचिकेत म्हटले आहे.

सीबीआयने दावा केला की, धूत यांना कोचर पती-पत्नीसमोर हजर करणे आवश्यक होते म्हणून आम्ही त्यांना नोटीस दिली होती. भलेही धूत यांनी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) सहकार्य केले असेल याचा अर्थ ते सीबीआयला तपासातही स्वेच्छेने सहकार्य करीत आहेत, असा नाही. दोन्ही बाजुंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने धूत यांना दिलासा देण्यास नकार दिला.

सीबीआयच्या माहितीनुसार जून २००९ आणि ऑक्टोबर २०११ दरम्यान आयसीआयसीआय बँकेने १,८७५ कोटी रूपयांचे मुदत कर्ज व्हिडिओकॉन ग्रुपच्या सहा कंपन्यांना मंजूर केले होते. मेसर्स व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडकडून घेतलेले असुरक्षित कर्ज परत करण्यासाठी हे कर्ज मंजूर करण्यात आले होते.

चंदा कोचर या बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बनल्यावर ही सगळी कर्जे मंजूर झाली होती. ३०० कोटी रूपयांचे आरटीएल मेसर्स व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि ७५० कोटी रूपयांचे आरटीएल मेसर्स व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडला मंजूर झाले तेव्हा कोचर या कर्ज मंजूर करणाऱ्या समितीवर होत्या. आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन ग्रुप कंपनीज मे. स्काय अप्लायन्स लिमिटेड आणि मे. टेक्नो इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या खात्यांना मुदत ठेवींच्या रुपात ५० कोटी रूपयांची सुरक्षाही दिली. दि. २६ एप्रिल, २०१२ रोजी सहा आरटीएल खाती १,७३० कोटी रूपयांच्या आरटीएलमध्ये अडजस्ट करण्यात करण्यात आली. हे १,७३० कोटी रूपये मे. व्हीआयएल डोमेस्टीक डेटसाठी रिफायनान्स अंतर्गत मंजूर केले गेले होते. मे. व्हीआयएलचे खाते ३० जून, २०१७ रोजी एनपीए जाहीर केले गेले.