कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका ३० एप्रिलपर्यंत घ्या:नागपूर खंडपीठाचे बाजार समिती प्राधिकरणाला  निर्देश

मतदारयाद्या नव्या होण्याची शक्यता, निवडणूक कार्यक्रम 15 मार्चपासून?

नागपूर ,५ जानेवारी  / प्रतिनिधी :- राज्यात कोरोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेसह बाजार समितीच्या निवडणूका पूढे ढकलण्यात आल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका ३० एप्रिलपर्यंत घेण्याचे निर्देश दिले  आहेत. 

महाराष्ट्र बाजार समिती निवडणूक प्रधिकरणाला ज्या बाजार समितीच्या निवडणूका स्थगित होत्या, त्याबाबत हे निर्देश दिले आहेत.ज्या कृषी उत्पन्न बाजार समितिचा कार्यकाल संपल्यानंतर जे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे तेथे शासकीय प्रशासक नियुक्ती  करण्यात यावी तसेच ज्या ठिकाणी निवडून आलेले संचालक मंडळ कार्यकाल संपल्यानंतरही कार्यरत आहे. त्यांनी शासनाकडे मुदतवाढ मिळावी म्हणून अर्ज करण्याबाबत मुभा दिली. त्यावर शासन /सक्षम अधिकारी वैयक्तिकरित्या तपासून निर्णय घेतील, असे  न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांना निवडणुकीत सहभागी होता यावे म्हणून दाखल याचिकांमध्ये न्यायमूर्ती रोहीत बी देव आणि न्यायमूर्ती वाय जी खोब्रागडे यांनी हे आदेश दिले