विमान बिघाडामुळे शिंदे-फडणवीस यांचा औरंगाबाद दौरा रद्द

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा औरंगाबाद दौरा विमानातील तांत्रिक बिघाडामुळे रद्द झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेंद्रा येथे महाराष्ट्र एक्स्पोचे उदघाटन होणार होते.

औरंगाबाद येथील शेंद्रा एमआयडीसी मध्ये एडवांटेज महाराष्ट्र एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात येणार होते. मात्र, हा दौरा रद्द करण्यात आला.

औरंगाबाद येथील शेंद्रा एमआयडीसीतील ऑरिक सिटी येथे आज महाराष्ट्रातील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो २०२३ चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन पद्धतीने याचे उद्घाटन केले.

एडवांटेज महाराष्ट्र एक्सपोच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येऊ शकले नाही. मात्र केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, अतुल सावे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे, औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैयस्वाल आणि कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांची उपस्थिती होती.