वैजापूर जिल्हा व सत्र न्यायालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन

वैजापूर ,​४​ जानेवारी  / प्रतिनिधी :- वैजापूर जिल्हा व सत्र न्यायालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बुधवारी (ता.04) अभिवादनाचा कार्यक्रम झाला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम.ए. यांच्या अध्यक्षतेखाली व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एम.आहेर,  दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर.एम.नेर्लेकर, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश एम.आर.कराडे, न्या.आर.एन. मर्क, न्यायदंडाधिकारी श्रीमती डी.एम.पवार, वकील संघाचे सचिव वैभव ढगे, वकील संघ ग्राहकसंस्थेचे  चेअरमन अँड सोपान पवार, वकील संघाचे सदस्य व न्यायालयीन कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. जिल्हा न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम.ए. यांनी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. वकील संघ व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.