अॅडव्हान्टेज एक्स्पो विद्यार्थ्यासाठी एक पर्वणी

प्रा. डॉ. आर .एम . दमगीर

प्रा. डॉ. आर .एम . दमगीर

रिक सिटी चिकलठाणा औरंगाबाद येथे दि ५- ८ जानेवारी २०२३ या कालावधीत होणारे औद्योगिक प्रदर्शन हे उद्दोगाला फार मोठी दिशा देणारे प्रदर्शन असेल.या मध्ये अनेक उद्दोजक भाग घेत असून अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयाचा सहभाग असणार आहे.उद्दोजकआणि तंत्र शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था एकत्र काम करू लागल्या तर औद्योगिक क्रांती व्हायला उशिर लागणार नाही .
ह्या प्रदर्शनाला अभियांत्रिकीच्या व इतर शाखेच्या विद्यार्थ्यांनी भेटी देऊन प्रगत ज्ञान आत्मसात करून आत्मनिर्भर व्हायला पाहिजे.नोकरी मागणाऱ्या पेक्षा नोकरी देणारे व्हायला पाहिजे.या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे शेकडो स्टॉल्स ऊभारले जाणार आहेत.२०-२२ चर्चासत्राचे आयोजन होणार आहे.लघु, मध्यम व मोठया उद्योगाशी संबधीत ज्ञान आणि कौशल्य यांचे आदान प्रदान होणार आहे. कौशल्य आणि तंत्रशिक्षण यांचा मेळ घातला तर उद्दमशिलता झपाट्याने वाढीस लागेल .
विद्यार्थ्यानी प्रत्येक स्टॉल भेटी देऊन माहिती घेतल्यास त्यांनी त्याचा फायदा भावी जीवनात अमुलाग्र बदल घडविणारा असेल पर्यायाने देशाला औद्यागिक चालना देणारा ठरु शकते म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी याचा फायदा घ्यावा असे आवाहन  शासकीय अभियांत्रिकीचे उद्योग अधिष्ठाता प्रा.डॉ.आर. एम. दमगीर यांनी विद्यार्थ्याना केले आहे. हे औद्योगिक प्रदर्शन म्हणजेच सर्वासाठी फार मोठी पर्वणी आहे असे भव्य दिव्य औद्योगिक प्रदर्शन आयोजीत केल्याबद्दल आयोजकाचे अभिनंदन व आभारही व्यक्त केले आहे
विज्ञानाच्या साह्याने अथवा इतर उपकरणे , साधने याव्दारे समाजाभिमुख व लोकोपयोगी असणारे शिक्षण म्हणजे तंत्रशिक्षण म्हणावे लागेल .सध्याचा शिक्षण प्रणाली मध्ये विविध शैक्षणिक धोरणे राबविली जात असून त्यामध्ये कायदयाचे ,वैद्यकिय ,समाज विज्ञान,तंत्र विज्ञान ,शेतकी , औषधी ,शिक्षण ,खनिज,टेक्सटाईल व इतर अनेक प्रकारचे दालनं ऊघडी झाली आहेत . त्यातच तंत्रशिक्षण हे अति महत्वाचे व रोजगार , भांडवल , गुंतवणूक  व नोकरी देणारे शिक्षण म्हणून अग्रगण्य आहे, तंत्रशिक्षणाला अनन्य साधारण महत्व आहे . राष्ट्राचा पर्यायाने समाजाचा विकास हा तंत्रशिक्षणावर अवलंबुन आहे.ज्या देशाचे तंत्रशिक्षण मजबुत असेल,तो देश मजबुत असतो ,स्वयंभूत असतो.
सर्व प्रथम तंत्रशिक्षणाचा प्रसार व्हावा त्यासाठी देशामध्ये प्राद्योगिक संस्थानाची ( आयआयटी ) निर्मिती झाली. प्रादेशिक तंत्रशिक्षण संस्था निर्माण झाल्या , प्रत्येक राज्याला एक याप्रमाणे विभागीय तंत्रशिक्षण संस्था निर्माण झाल्या व तंत्रशिक्षणाचे जाळे विणले गेले.तंत्रशिक्षणाचा प्रसार झपाटयाने व्हायला लागला व त्याचा उपयोग समाजाला व्हायला लागला .
मराठवाड्यापुरते बोलायचे झाले तर सुरूवातीला म्हणजेच १९६० ला एकच अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथे उघडले गेले .नंतर तंत्रनिकेतन , औद्योगिक तंत्र संस्था निर्माण झाल्या आणि मागास भाग म्हणून संबोधला जाणाऱ्या मराठवाडयात तंत्रशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली व तंत्रशिक्षणाचे दालन खऱ्या अर्थाने ऊघडले गेले . त्या काळात अभियांत्रिकी शिक्षण म्हणजे अत्यंत कठीण असलेले शिक्षण समजले जायचे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी हे बोटावर मोजण्या इतकेच असत. थोडे थोडकेच विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण घेरुन बाहेर पडायचे .१९८३ नंतर काही खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतने उघडली गेली . मराठवाडयाच्या जिल्हया जिल्हयात तंत्रशिक्षण पोहचू लागले .ऊच्च शिक्षण खेडयापाड्यापर्यंत व परिस्थितीने गरिब विद्यार्थ्यापर्यंत पोहचू लागले खरे तर येथूनच मराठवाडयात तंत्रशिक्षणाची गंगा वाहु लागली. तंत्रज्ञ ,उद्योजग,कुशल कामगाराची फळी मराठवाडयात निर्माण होऊ लागली .
तंत्र शिक्षाणाचा खरा उपयोग ऊद्योगनिर्मिती व चार हाताला काम देण्यासाठी होतो . रोजगार निर्मिती व भांडवल वाढीस लागते . निजामाच्या जोखडात अडकलेला मराठवाडा तंत्रशिक्षणानेही मुक्त होऊन प्रबळ होऊ लागला. त्या काळात मराठवाडयात फक्त औरंगाबादला थोडेसे ऊद्योग होते.अभियंते तंत्रशिक्षण घेऊन बाहेर पडायला लागले. स्थापत्य , यंत्र , विद्युत अभियांत्रिकी मध्ये शिक्षण घेतलेल्या काही अभियंत्याने नोकरी पत्करली तर काही अभियांत्याने स्वतःचे ऊद्योग निर्माण करण्यास सुरुवात केली .बांधकाम व्यवसाय ,यंत्रनिर्मिती ,विद्युत उपकरणे , प्लास्टिक उद्योग , स्टिल उद्योग , पेपर उद्योग असे नाना प्रकारचे उद्योग उभारले गेले , पुढे बजाज,स्कोडा ,गरवारे ,पर्किन्स ,व्हेरॉक,जॉन्सन अँड जॉन्सन ,सिमेन्स ,स्टर,लाईट, गुडइयर टायर ,फोस्टर्स,लुपीन ,महिको यासारखे मोठे उद्योग औरंगाबादला आले, अनेकांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या ,रोजगार मिळायला लागला व मराठवाडयाचा चेहरामोहरा बदलायला लागला. जवळपास साडेचार हजार इंडस्ट्रियल युनिट्स कार्यरत आहेत.ऐंशी पेक्षा जास्त देशात निर्यात केली जाते.पैठण , चित्तेगाव , वाळुज , डकीन , चिकलठाणा , शेंद्रा येथे औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या प्रत्येक महिन्याला दीड लाख टन स्टिलचे ऊत्पादन करणाऱ्या कंपन्या , एकावन्न पेक्षा जास्त औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या ,ऑटोमोबाईल क्षेत्राचा प्रचंड विस्तार व निर्मीती ,कृषी क्षेत्राशी निगडीत बियाणे  निर्मिती करणाऱ्या तीस पेक्षा जास्त कंपन्या , लातुर , हिंगोली ,नांदेड,परभणी येथून सोयाबीनचे विक्रमी उत्पादन तर जालना , सिल्लोड , कन्नड येथून विक्रमी मक्याचे ऊत्पादन संपूर्ण देशभरात पुरविले जाते . वसमत विभागात ऊत्कृष्ठ हळदीचे केंद्र उभारले आहे व त्याची निर्यात आंतरराष्ट्रीय  बाजारपेठेत होते.परभणी येथील कृषी विद्यापीठाचा कृषी ऊत्पादन मार्गदर्शनामध्ये मोलाचा वाटा आहे . वाल्मीसारखे जलसंधारण , मृद संधारणचे येथायोग्य नियोजन करणारी संस्था मराठवाडयासाठी अतीव प्रयत्न करत असते तसेच जगप्रसिध्द पैठणीचे निर्माण औरंगाबाद मध्ये केले जाते . यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दोन लाखापेक्षा जास्त रोजगार निर्माण झाले आहेत .
औरंगाबाद येथे स्टार्टअप,अंत्रप्रयूनअरशिप, मॅजिक, इन्क्युबेशन केंद्र निर्माण झाले आहेत त्यामुळे उभरत्या अभियंत्यांना नवनिर्माण करण्याच्या संधी प्राप्त झाल्या आहेत.जायकवाडी धरणाच्या निर्मिती मध्ये स्थानिक अभियंत्यांचा मोलाचा वाटा आहे.पुढे जायकवाडीचे दोन्ही कालवे बांधले व पैठण मधून जायकवाडीचे पाणी थेट नांदेडपर्यंत पोहचले.मराठवाडा सुजलाम सुफलाम व्हायला लागला.मराठवाडयाची आर्थिक बाजु मजबुत होऊ लागली. आर्थिक मागासलेपणा  हळुहळु कमी होऊ लागला. यासाठी अभियंत्याचे व येथील सर्व स्तरातील तज्ञ व जनतेचे मोलाचे योगदान असल्यामुळेच हे शक्य होऊ लागले.
पुढे तंत्रशिक्षणाशी निगडीत संघटना,गट निर्माण होऊ लागले .मसिआ , सिएमआयए , सीआयआय यासारख्या संघटनांची  बांधणी झाली व त्यांनी समाज ,उद्योग व शैक्षणिक संस्था एकत्र जोडून एकमेकांना पुरक अशा सुविधा निर्माण केल्या व विद्यार्थ्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा निर्माण केल्या.पुढे मराठवाडयात इन्फ्रास्ट्रक्चर्स वाढले.रस्त्याचे जाळे विणले गेले .कच्चा माल उद्योगाला प्राधान्याने व कमी वेळात पुरवला जाऊ लागला.उद्योग क्षेत्राला भरभराटी येऊ लागली ,उद्योग वाढीस लागले आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे औरंगाबादचे उद्योग हे जगाच्या नकाशावर आले.औरंगाबादचा पर्यायाने मराठवाडयाचा नावालौकिक जगात वाढला .न भुतो न भविष्यती असे डीएमआयसी ( बिडकीन आणि शेंद्रा ) औरंगाबादला उभी राहिली.औरंगाबादचा माल परदेशात जायला लागला . नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात औरंगाबाद उद्योगाच्या बाबतीत जगात पाचव्या स्थानावर आले हे अभिमानास्पद आहे .मराठवाडयाचा आर्थिक स्रोत वाढला व मराठवाडयाचे आर्थिक मजबुतीकरण झाले.हे सर्व साध्य होणेसाठी यामध्ये तंत्रशिक्षणाचा व उद्योगाचा सिंहाचा वाटा आहे.मराठवाडयाचा विकासात व मागासलेपण दूर  करण्यात तंत्रशिक्षण हे केंद्रबिंदु ठरले.