‘त्यांच्या’ वेशभूषेवर आक्षेप घेऊन दाखवा; उर्फी जावेद-चित्रा वाघ वादात सुषमा अंधारे यांची उडी

मुंबई,​३​ जानेवारी  / प्रतिनिधी :- भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेदच्या वेषभूषेवरून टीका केली होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे याबाबतची तक्रारदेखील केली होती. एवढेच नव्हे तर, ‘उर्फी जावेदचे प्रताप थांबले नाहीत तर, तिला दिसेल तिथे थोबडवणार’ असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला होता. पण यांच्या वादामध्ये आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील उडी मारली आहे. त्या चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना म्हणाल्या की, “उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” असा सवाल चित्रा वाघ यांना विचारला आहे.