मला आणि माझ्या कुटूंबाला एका दहशतवाद्यांप्रमाणे वागणूक -रियाचा आरोप

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीने आता प्रसार माध्यमांसमोर येण्यास सुरुवात केली आहे. रियाच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसल्यानंतर तिने प्रसार माध्यमांना मुलाखती देण्यास सुरुवात केली. यात तिने स्वतःची बाजू मांडत निर्दोश असल्याचा उल्लेख वारंवार केला आहे. सुशांतच्या प्रकरणामुळे मी दुःखात असतानाही मला आणि माझ्या कुटूंबाला एका दहशतवाद्यांप्रमाणे वागणूक मिळत आहे, असा आरोप रियाने केला आहे.

riya chakravarthi -


 
सुशांत सिंह प्रकरणी शुक्रवारी सकाळपासून रियाची चौकशी सुरू आहे. त्याच वेळी दुसऱ्या खोलीत सिद्धार्थ पीठाणीची चौकशी सुरू आहे. नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्‍यूरोचे पथक रियाला सम्नस पाठवणार आहे. ड्रग्ज अँगल पुढे आल्यानंतर मुद्दामहून रियाने मुलाखती देऊन साक्षीदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही रियावर लावला जात आहे. नारकोटिक्सचे पथक गुरुवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाले होते. मुंबई कार्यालयात पोहोचल्यानंतर लगेचच या प्रकरणी धडक कारवाई सुरू केली.

ईडी अधिकाऱ्यांनी घेतली एनसीबी पथकाची भेट
गुरुवारी नार्कोटिक्सचे पथक मुंबईत पोहोचल्यानंतर शुक्रवारी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. ईडीने रियाचा स्मार्टफोन क्लोन करत व्हॉटसअॅप संभाषण मिळवले होते. यातच ड्रग्जबद्दल एक धागा आढळून आला होता. नार्कोटिक्सचे पथक त्यानंतर लगेचच आपल्या कार्यालयात पोहोचली आणि आवश्यक कार्यवाही सुरू केली.

बंगाली दोस्त रिया चक्रवर्ती की वजह से तनाव में थे सुशांत सिंह? मौत से पहले  भेज दिया था घर


रियाला समन्स पाठवण्याची तयारी
शुक्रवारी एनसीबीच्या अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. त्यात सुशांत प्रकरणी ड्रग्ज अँगल तपासणे हा मुद्दा महत्वाचा होता. पुढील कार्यवाहीचा अॅक्शन प्लान तयार करण्याची सुरुवात या बैठकीत झाली. नार्कोटिक्सतर्फे रियाला चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. त्यासाठी समन्स पाठवले जाऊ शकते. या प्रकरणात शौविक चक्रवर्ती, जया साहा, सॅमुअल मिरांडा यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे.
एनसीबीमुळेच सीबीआय अॅक्शनमध्ये
रिया चक्रवर्तीला आठव्या दिवशी चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. त्यामागे एक मोठे कारण नार्कोटिक्सचा तपासही मानला जात आहे. नार्कोटीक्स ब्युरोने ड्रग्ज चॅटनंतर रियाविरोधात खटला दाखल केला आहे. एनसीबीने जर रियाविरोधात आणखी पुरावे गोळा करून तिला ताब्यात घेतले तर सीबीआयच्या तपासावर परिणाम होईल, अशी शक्यता असल्याने सीबीआय अॅक्शनमध्ये आल्याचेही सांगण्यात येत आहे. गुरुवारी नार्कोटिक्सचे पथक मुंबईत आल्यानंतर शुक्रवारी लगेचच समन्स बजावण्यात आले होते.
 रियाचे स्पष्टीकरण
“रियाने या बद्दल आता स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली आहे. सुशांत घेत असलेल्या औषधांमध्ये काहीही गैर नाही. त्याची सर्व औषधे पाच मोठे डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते. त्यांच्या निर्देशानुसारच तो औषधे घेत होते. मी सुशांतवर मनापासून प्रेम करत होते. त्याचेही माझ्यावर प्रेम होते. याचा अर्थ मी त्याच्यासोबत पैशासाठी राहत होते. सुशांतच्या खात्यातील १५ कोटी कुठे गेले हे पोलीसांनी तपासावे, सीबीआयने शोधावे, ही साधी रक्कम नाही. त्याचा तपास लावावा”, असे आवाहनही तिने तपास यत्रणांना केले आहे.
 
मला न्याय मिळवण्याचा अधिकार नाही का ?
 
 
मी सुशांतला कुठल्याही गोळ्या किंवा काही प्रकृतीबद्दलचे उपचार केले नव्हते. त्याच्यावर उपचार पाच डॉक्टर करत होते. हिंदूजा रुग्णालयात दाखल झाला होता, त्याच्यावर उपचार सुरू होते. त्या डॉक्टरांना चौकशीसाठी का बोलावले जात नाही. मितू सिंह सुशांतच्या घरी आल्यानंतर सुशांतने मला जायला सांगितले होते, त्यावेळी मी दुखावले होते. सुशांतने महिनाभर मला पुन्हा बोलावले नाही. माझ्याशी ब्रेकअप केले की काय, अशी भीती मला वाटली होती. सुशांतच्या मृत्यूचा मलाही तितकाच धक्का बसला आहे. मात्र, मी त्याच्या जवळ असूनही मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे, माझ्या कुटूंबियांनाही याचा फटका बसत आहे. दररोज मला कुठल्या न कुठल्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे आणि मी ते जात आहे, परंतू दररोज उठून माझ्यावर आरोप केले जात आहेत, तर या देशात मला न्याय मिळवण्याचा अधिकार नाही का ?, असा प्रश्न तिने विचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *