देशात २४ तासांत १ हजार ५७ कोरोना रुग्णांचा मृत्यू ,26 लाख रुग्ण बरे झाले

नवी दिल्ली,28 ऑगस्ट :

भारतात गेल्या २४ तासांमध्ये देशात ७७ हजार २६६ नव्या रुणांची नोंद झाली असून १ हजार ५७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ३३ लाख ८७ हजार ५०१ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ६१ हजार ५२९ रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

देशात अनेक सक्तीचे नियम लागू केल्यानंतरही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याचं चित्र समोर आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी १ सप्टेंबरपासून देशात अनलॉक ४ सुरू होणार आहे. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणं, मास्क वापरणे इत्यादी नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचं आहे.

अशा कठीण प्रसंगी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. सध्या देशात ७ लाख ४२ हजार २३ रुग्णांवर उपचार सुरू असून २५ लाख ८३ हजार ९४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

केंद्र सरकारच्या ‘टेस्ट-ट्रॅक-ट्रीट’ धोरणानुसार देशात रुग्ण बरे होण्याचा दर सतत सुधारत आहे तर मृत्यू दर कमी होत आहे. गेल्या पाच महिन्यांत, कोविड-19 चे 3/4 पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत आणि आता 1/4 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण बरे होत असल्यामुळे तसेच गृह विलगीकरणासाठी (रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरूपाची लक्षणे) रुग्णालयातून घरी सोडण्यात येत आहेत, त्यामुळे भारतात कोविड-19 चे सुमारे 26 लाख रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 76.28 टक्के इतका झाला आहे.

बरे झालेल्या रुणांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा 3.5 पट आहे, म्हणजेच एकूण रुग्ण संख्येच्या 21.90 टक्के आहे. बरे होत असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत देखील सातत्याने वाढत आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा 18 लाखांनी जास्त झाली असून ती आता 18,41,925 इतकी झाली आहे.

घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून संपर्क साधण्यावर लक्ष केंद्रित करण्यावर जोर दिल्यामुळे चाचण्यांमध्ये वाढ करून बाधित रुग्ण लवकर शोधण्यात मदत होत आहे. त्यामुळे बाधित रुग्ण आढळल्यास त्यांना त्वरित गृह विलगिकरण किंवा रुग्णालयात दाखल केले जात आहे. रुग्णांमध्ये सौम्य किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे असल्यास त्यांना गृह अलगिकरणात तर गंभीर स्वरूपाची लक्षणे असल्यास त्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहेत.

केंद्र सरकारने कोविड व्यवस्थापनासाठी रुग्णालय सुविधांवर भर दिला आहे. यासाठी सरकारने देशभरात तीन पातळ्यांवर कोविड व्यवस्थापन सुविधा सुरू केल्या आहेत. गंभीर रुग्णांसाठी आयसीयू खाटा आणि व्हेंटिलेटर सह कोविड समर्पित रुग्णालय, ऑक्सिजन बेड आणि ‘डॉक्टर ऑन कॉल’ सुविधा यासह कोविड आरोग्य केंद्र आणि अलगिकरण खाटांसह कोविड केअर केंद्र सुरू आहेत. देशात सध्या 15,89,105 अलगीकरण खाटा, 2,17,128 ऑक्सिजन बेड, 57,380 आयसीयू बेड सह 1723 कोविड समर्पित रुग्णालय, 3883 कोविड समर्पित आरोग्य केंद्र आणि 11,689 कोविड केअर केंद्र आहेत.  बाधित रुग्णांवरील परिणामकारक उपचारामुळे कोविड मुळे होणारे मृत्यू कमी झाले आहेत.कोविड मृत्यू दरात मोठ्या प्रमाणावर घट होऊन तो आज 1.82% इतका झाला आहे.

चाचण्यांची संख्या 4 कोटींच्या नव्या शिखराजवळ

केंद्र सरकारच्या  “तपासण्या, ओळख आणि उपचार” रणनीतिवर लक्ष केंद्रित करत देशात सलग दुसऱ्या दिवशी कोविड-19 च्या नऊ लाखांहून अधिक नमुन्यांची चाचणी करण्यात आली.भारताने याआधीच कोविड-19 च्या दररोज दहा लाख चाचण्यांची क्षमता निर्माण केली आहे. गेल्या 24 तासात  9,01,338 नमुने तपासण्यात आले.

या वेगवान चाचण्यांमुळे देशात आतापर्यन्त  कोविड-19 च्या एकूण सुमारे चार कोटी नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यन्त 3.94,77,848 नमुने तपासण्यात आले. गेल्या दोन आठवड्यात कोविड-19 च्या  1 कोटींहून अधिक नमुन्यांची चाचणी घेण्यात आली.

प्रति दहा लाख लोकांच्या चाचण्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली असून ही संख्या 28,607 वर गेली आहे.  केवळ आक्रमक चाचणीद्वारेच प्रारंभिक टप्प्यावर बाधीत रुग्ण ओळखता येतात.  त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेता येतो, आणि त्यांचे अलगीकरण करून  वेळेवर आणि प्रभावी उपचार केले जाऊ शकतात.

वर्गीकृत आणि सातत्यपूर्ण  प्रतिसादाचा परिणाम म्हणून चाचणीची रणनीती तयार झाली आहे ज्याने देशातील चाचणीचे जाळे निरंतर विस्तरले आहे.  या धोरणाच्या मदतीने  देशातील चाचणी प्रयोगशाळेचे जाळे  मजबूत केले गेले आहे ज्यात आजपर्यंत देशातील 1564 प्रयोगशाळा आहेत; सरकारी क्षेत्रात 998  आणि 566 खासगी प्रयोगशाळांचा यात समावेश आहे.

  • रिअल टाइम रॅपिड टेस्ट पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा 801:  (शासकीय 461+ खासगी :  340)
  • ट्रू नॅट आधारित चाचणी चाचणी प्रयोगशाळा 643 : (शासकीय : 503 + खासगी 140)
  • सीबीएनएएटी आधारित प्रयोगशाळा : 120  (शासकीय :  34 + खासगी : 86)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *