मेहमूद दरवाजाचे दुरुस्तीचे काम 15 दिवसात पूर्ण करा- प्रशासक डॉ.चौधरी

अवजड वाहने आणि रुग्णवाहिकेची वाहतूक सुरू करणार ,जड वाहनांना प्रवेश नाही

औरंगाबाद,२ जानेवारी  / प्रतिनिधी :-ऐतिहासिक महमूद दरवाजा 15 दिवसाच्या आत वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे निर्देश औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी आज दिले.
 आज त्यांनी मेहमूद दरवाज्याचे बळकटीकरण व सौंदर्य करणचे सुरू असलेले कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरू असलेली विविध कामे जसे की दरवाज्याची छत इत्यादीची पाहणी केली आणि संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना सदरील काम 15 दिवसात पूर्ण करून लहान वाहनांची वाहतूक सुरू करावी असे आदेश दिले.
सदरील रस्ता जड वाहनांसाठी मात्र बंद ठेवण्याची निर्देश त्यांनी यावेळी दिले. जड वाहनांच्या प्रवेश थांबण्यासाठी योग्य त्या अंतरावर बॅरियर किंवा बार लावण्याचे निर्देशत्यांनी दिले. बार लावत असताना रुग्णवाहिका जाऊ शकते यावर लक्ष ठेवण्यासंबंधी त्यांनी सूचना केल्या.
यावेळी प्रशासक महोदयांनी पानचक्की पुलावर लावण्यात आलेले वर्टीकल गार्डन ची देखील पाहणी केली आणि सूचना केल्या. याच बरोबर पाणचक्की पुलाच्या भिंतीवर उगलेले झाडे झुडपे आणि मुळ्या काढून घेण्याचे त्यांनी यावेळी निर्देश दिले.
यावेळी स्मार्ट सिटी चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, नंददीप डिझायनर्स चे कन्सल्टंट महेश वर्मा, प्रकल्प व्यवस्थापक किरण आढे, इमरान खान, कनिष्ठ अभियंता नेत्रा जाधव, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, कनिष्ठ अभियंता गोपीचंद चांडक जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद आदींची उपस्थिती होती.

शिवसृष्टीचे बांधकाम 31 जानेवारी पर्यंत पूर्ण करा
औरंगाबाद:-क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित  शिवसृष्टीचे बांधकाम 31 जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आज औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी दिले.


2 जानेवारी रोजी त्यांनी क्रांती चौक येथील उड्डाणपुलाखाली सुरू असलेले शिवसृष्टीचे कामांच्या आढावा घेतला आणि सूचना केल्या.यावेळी त्यांनी गट्टू बसविणे, फ्लोरिंग, प्रकाश व्यवस्था, टाईल्स एमपीथेटर इत्यादींचे कामांचा आढावा घेतला आणि कामाची गती वाढविण्याचे आदेश दिले.यावेळी त्यांनी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसून घेण्याचे निर्देश देखील दिले.
तसेच संबंधित गुत्तेदार आणि अधिकारी यांनी 31 जानेवारीपर्यंत सदरील प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण करावे असे आदेश दिले.यावेळी स्मार्ट सिटी चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, प्रकल्पाचे कन्सल्टंट अजय ठाकूर, प्रकल्प व्यवस्थापक किरण आढे, इमरान खान, कनिष्ठ अभियंता नेत्रा जाधव, जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद आदींची उपस्थिती होती