वैजापुरात नोकरी महोत्सवाला बेरोजगार युवक – युवतींचा प्रतिसाद

वैजापूर ,​२​ जानेवारी / प्रतिनिधी :- जे. के. जाधव महाविद्यालय वैजापूर व फर्स्ट जॉब फाउंडेशन डीस्टिल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील करुणा निकेतन शाळेत सोमवारी (ता.02) भव्य नौकरी महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवात तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी व बेरोजगार खूप मोठ्यासंख्येने आले होते. मेळाव्यासाठी  औरंगाबाद येथील विविध अकरा कंपनीचे अधिकारी आले होते. बेरोजगार युवकांना त्यांच्या पात्रतेनुसार उपलब्ध जागाबाबत माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली व जे पात्र होते त्यांना जॉब उपलब्ध करून दिले.

या महोत्सवाचे उदघाटन माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती व वैजापूरचे उद्योजक शांतीलाल पहाडे यांनी केले. करुणा निकेतन शाळेचे मुख्याध्यापक फादर संजय ब्राह्मणे, माजी उद्योग संचालक जे.के.जाधव व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांची मेळाव्यास प्रमुख उपस्थिती होती.जे.के.जाधव, बाळासाहेब संचेती व श्री पहाडे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. नौकरीच्या शोधातआलेल्या मुलां-मुलींना या संधीचे सोने करण्याचे आवाहन करून कंपनीच्या अधिकारी वर्गाला युवकांना सामावून घेण्याचे त्यांनी आवाहन केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य भिंगारदेव, उप प्राचार्य सुनील कोतकर, ग्रंथपाल प्रा.पंकज साळुंके,प्रा.पी.एम.गायकवाड, मंगेश भागवत, पी.बी.पाटील, दीपक आवारे, नारायण मगर, झिंजुर्डे,   राऊत, खरात यांनी सहभाग नोंदविला.