नारंगी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

वैजापूर ,​२​ जानेवारी  / प्रतिनिधी :- वैजापूर शहराजवळच्या नारंगी धरणात बुडुन तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना सोमवारी उघडकिस आली. तुषार बाबासाहेब बोडखे (२०, पाटील गल्ली) असे मृताचे नाव आहे. नारंगी धरणाच्या पाण्यात पडल्याने संजय बोडखे यांनी त्याला बाहेर काढुन बेशुद्धावस्थेत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासुन मृत घोषित केले. याप्रकरणी वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरुन वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संतोष सोनवणे हे करीत आहेत.