औरंगाबाद जिल्ह्यात 426 कोरोनाबाधित रुग्णांची भर ,तेरा मृत्यू

जिल्ह्यात 16979 कोरोनामुक्त, 4534 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दिनांक 27 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 266 जणांना (मनपा 178, ग्रामीण 88) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 16979 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 426 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22185 झाली आहे. आजपर्यंत एकूण 672 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4534 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सकाळनंतर 212 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 43, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 73 आणि ग्रामीण भागात 55 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)आहे.

ग्रामीण (67)
बजाज नगर, वाळूज (2), वाळूज महानगर एक (2), मनूर (1) एकीड तांडा (1), नायगाव (1), ओमसाई नगर, रांजणगाव (3), साई कॉलनी, वाळूज (1) औरंगाबाद (14), फुलंब्री (3), गंगापूर (24), कन्नड (7), सिल्लोड (2), वैजापूर (2), सोयगाव (4),

मनपा (29)
न्याय नगर (1), एन दोन सिडको, अजय नगर (2), एन दोन सिडको (1), कोटला कॉलनी (1),
हरिओम नगर, जटवाडा (1), पेठे नगर, भावसिंगपुरा (1), घाटी परिसर (1), हर्सुल (1), गणेश नगर (1), कासलीवाल तारांगण (1), एनआरएच हॉस्टेल (2), खडकेश्वर (1), विश्वभारती कॉलनी (1), मार्ड हॉस्टेल (1), टीव्ही सेंटर (1), शेंद्रा एमआयडीसी (1), एन सात सिडको (2), बीड बायपास, सातारा परिसर (2), गजानन नगर (1), एन सतरा, शिवेश्वर कॉलनी (1), विश्रांती नगर (1), खंडोबा मंदिर परिसर, सातारा परिसर (2), पहाडसिंगपुरा (1), एमआयडीसी, रेल्वे स्टेशन कॉलनी (1)

सिटी एंट्री पॉईंट (43)
बजाजनगर (04), समर्थनगर (01), तारांगण, पडेगाव (01), मिटमिटा (01), अरिहंत नगर,जटवाडा (01), पवन नगर (01), उल्कानगरी (01), सातारा परिसर (01),शेंद्रा एमआयडीसी (1), सातारा परिसर (03), जळगाव (02), कन्नड (02), पेठे नगर (01), छावणी (02), मयूरपार्क (01), जाधववाडी (05), एन-बारा, सिडको (01), रामनगर (01), पिसादेवी (01), जय भवानी नगर (01), खडकेश्वर (01), म्हाडा कॉलनी, पैठण (01), एम-2, हडको (01), चितेगाव (02), कांचनवाडी (02), नक्षत्रवाडी (01), एन दहा, पोलिस कॉलनी (01), उस्मानपुरा (02)

तेरा कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत विठ्ठल नगरी, जोगेश्वरी, गंगापुरातील 33 वर्षीय पुरूष, स्वामी समर्थ नगर, वैजापुरातील 76 वर्षीय स्त्री, वडवाणी, पैठणमधील 58 वर्षीय पुरूष, भवानीपुरा, सोयगावातील 60 वर्षीय पुरूष, खुप्टा, सिल्लोड येथील 74 वर्षीय स्त्री, वैजापुरातील 52 वर्षीय पुरूष, असेगाव गंगापुरातील 80 वर्षीय पुरूष , पिशोर, कन्नड ग्रामीण रुग्णालयात पिशोर, शाहुबा नगरातील 74 वर्षीय पुरूष, जिल्हा सामान्य रुग्णालयात गारखेड्यातील 80 वर्षीय स्त्री, विविध खासगी रुग्णालयांमध्ये गद्दीगोडाऊन, छावणी परिसरातील 61 वर्षीय पुरूष, गवळीपुऱ्यातील 65 वर्षीय पुरूष, म्हसोबा नगर, जाधवमंडीतील 81 वर्षीय पुरूष आणि बुडीलेन, कबाडीपु-यातील 48 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *