शी…ऽऽऽऽ अरे.. हे काय चाललंय मुंबईत? उर्फीला बेड्या ठोकण्याची चित्रा वाघ यांची मागणी

चित्रा वाघ यांना उर्फी जावेद ने दिलं सणसणीत उत्तर

उर्फीला बेड्या ठोकण्याची चित्रा वाघ यांची मागणी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्फी जावेदला उत्तानपणे नंगटपणा करणारी बाई म्हणत भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्या अटकेची मागणी केली आहे.

आपल्या विचित्र फॅशनमुळे उर्भी जावेद नेहमीच चर्चेत असते. तिने फॅशन म्हणून परिधान केलेल्या प्रत्येक कपड्यांची सोशल मीडिया तसेच माध्यमांकडून दखल घेतली जाते. याच विचित्र फॅशन सेन्समुळे तिला काही लोकांकडून टोकाचा विरोधही केला जातो. विचित्र वाटणारे वस्त्र परिधान करू नयेत, असा सल्ला अनेकजण तिला देतात. तर काही जण तिच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करतात. दरम्यान, आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यादेखील उर्फी जावेदवर भडकल्या आहेत.

चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या अटकेची मागणी करणारे एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी मुंबई पोलिसांनादेखील टॅग केले आहे.

“अरे.. हे काय चाललंय मुंबईत? ही बाई सार्वजनिक ठिकाणी नंगटपणा करत आहे. तिला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडे काही कलमे आहेत की नाही? उर्फी जावेदला तत्काळ बेड्या ठोकाव्यात. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत. तर ही बया अजून विकृती पसरवत आहे,” असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे.आता या सर्व प्रकरणावर मुंबई पोलीस काय भूमिका घेत आहेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

चित्रा वाघ यांना उर्फी जावेद ने दिलं सणसणीत उत्तर

 चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांना उर्फीला बेड्या ठोकण्याची मागणी केली होती.  आता हे प्रकरण वाढताना दिसत असून उर्फी जावदने चित्रा वाघ यांना सणसणीत उत्तर दिलं आहे.

सध्याच्या राजकारण्यांना पाहून वाईट वाटतं. लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला टार्गेट केलं जात आहे. बलात्कारासाठी माझ्या कपड्यांना दोष दिला जातोय. समाजामध्ये आणखी काही मुद्दे आहेत, बेरोजगारी, लाखो बलात्काराच्या केसचे निकाल प्रलंबित आहेत त्याचं काय? असा सवाल उर्फी जावेदने केला आहे. उर्फीने चित्रा वाघ यांच्या ट्विटला रिप्लाय देत निशाणा साधला आहे. माझ्यावर टीका करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या महिलांना खरंच प्रत्यक्ष मदतीची गरज आहे त्यांना तुम्ही  का मदत करत नाही. महिलांचं शिक्षण, लाखो बलात्काराची प्रलंबित प्रकरण यावर आपण का बोलत नाही, असं उर्फी जावेदने म्हटलं आहे.