विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; पुढील अधिवेशन २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईत

नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अर्थसंकल्पिय अधिवेशन २७ फेब्रुवारी २०२३ रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा  उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत तसेच अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.