स्मरणाने जो क्रोध उत्पन्न होतो, विद्वान त्यास  द्वेष असे म्हणतात

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

“घराघरात स्वर्वेद,मनामनांत स्वर्वेद, जनमनांत स्वर्वेद”

आजचा दोहा

जो सुख पूर्वहिं भोगिया, सुखन ज्ञान जेहि माहिं । 

स्मरण देखि ता लोभिया, राग कहत हौं ताहिं ।।२४७।। 

जो जो दुख जिसमें भयो, पूर्व काल ही माहिं । 

रोष साधन स्मरण में, द्वेष कहैं बुधि ताहिं ।।२४८।। 

(स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय) ०६/०६/२४७, २४८

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

जे सुख पूर्वी अनुभवास आलं , ज्या पदार्थांच्या प्राप्तिमुळे सुखाचा बोध झाला, त्यांना बघून अथवा स्मरण करून त्यांच्याप्रति जे आकर्षण निर्माण होते, त्यास राग म्हणजेच आसक्ती म्हटलं जातं. ज्या-ज्या पदार्थां पासून अथवा व्यक्तीं पासून पूर्वी दु:खाचा अनुभव झाला, त्यांच्या स्मरणाने जो क्रोध उत्पन्न होतो, विद्वान त्यास  *द्वेष* असे म्हणतात.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org