ती अज्ञानाची ग्रंथी (गाठ) ,अस्मिता आहे आणि हा भ्रम, दु:खाची खाण

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

“घराघरात स्वर्वेद,मनामनांत स्वर्वेद, जनमनांत स्वर्वेद”

आजचा दोहा

अशुचि शुची सुख दुखन में, भ्रम अनित्य नित्य भासु । 

आत्म अनात्महिं में भसै, कहत अविद्या तासु ।।२४५।। 

 पृथक् बुद्धि वर्तमान को, आतम भिन्न न जान । 

 वृत्ति अस्मिता मानिये, ग्रन्थि भ्रान्ति दुख खान ।।२४६।।

(स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय)०६/०६/२४६

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

अपवित्रला पवित्र, दु:खाला सुख, क्षणभंगुरला शाश्वत, जड ला चेतन समजणे ही अविद्या आहे. आत्मज्ञानाहून पृथक् अन्य जड अनित्य पदार्थांप्रती ओढ असणे आणि जड हे चेतनाहून भिन्न आहे असे ज्या क्षणी ज्ञान होत नाही (म्हणजेच जड, अचेतन पदार्थ हे चेतन पदार्थां पासून वेगळे आहेत, असे ज्याक्षणी ज्ञान होत नाही) ती अज्ञानाची ग्रंथी (गाठ) , अस्मिता आहे आणि हा भ्रम, दु:खाची खाण आहे.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org