वैजापुरात भाजपतर्फे स्व.अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

वैजापूर,२५ डिसेंबर / प्रतिनिधी :-भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी पंतप्रधान अटलजी बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वैजापूर शहर भाजपच्यावतीने अभिवादनाचा कार्यक्रम रविवारी (ता.25) भाजपा कार्यालय येथे घेण्यात आला.

या प्रसंगी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी,  पालिकेतील भाजप गटनेते दशरथ बनकर, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, नगरसेवक गणेश खैरे,  राजेश गायकवाड, गोकुळ भुजबळ, ज्ञानेश्वर आदमाने, महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष,जयमाला वाघ, प्रेम राजपूत, शैलेश पोंदे, सागर राजपूत, राजुभाऊ राजपूत, प्रदीप चव्हाण, सचिन दाढे, रूद्रा शेजवळ, गिरीश चापानेरकर, आकाश शिंदे, सन्मित खनिजो, नवीन श्रीवास्तव, नितीन तांबे, जितू पवार, अजय शिंदे, ज्योती हंगे, पूनम पठारे, ज्योती सोमवंशी, पुष्पा बागुल आदी उपस्थित होते.