जांबरगाव येथे 40 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे आ.बोरणारे यांच्या हस्ते भूमीपूजन

वैजापूर,२५ डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे विविध विकास कामांसाठी 40 लक्ष 43 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांचा भूमिपूजन सोहळा रविवारी (ता.25) आ. रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते पार पडला.
जलजीवन मिशन नळ जोडणी 30 लक्ष 43 हजार रुपये कामांचे भूमिपूजन. स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक बसविणे 7 लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन. ग्रामपंचायत 15 व्या वित्त आयोगातून पाण्याची टाकी बांधकाम करणे 3 लक्ष रुपये अशा एकुण 40 लक्ष 43 हजार रुपये रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.

या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख राजेंद्र साळुंके, उपविभागप्रमुख हरिभाऊ साळुंके, सरपंच रोहिणी साठे, उपसरपंच भगवान साठे, पार्वताबाई चौकडे, निर्मलाबाई गायकवाड, रुपाली जगताप, नंदाबाई शेजवळ, दादासाहेब शेजवळ, बबनराव आरगडे, सुभाष साठे, कचरु गायकवाड, राजेंद्र गवळी, जालिंदर गवळी, भरत साठे, रवींद्र साठे, विजय साठे, गणेश साठे, राजेंद्र म्हैसमाळे, अशोक साठे, संतोष गायके, नारायण जगताप, सुदाम जगताप, छगन जगताप, विजय शेजवळ, ज्ञानेश्वर साठे, काशीनाथ साठे, बाळनाथ जगताप, दौलत साठे, दिपक साठे, देविदास साठे, दत्तु साठे, रवींद्र शेजवळ, गणेश साठे, भगवान साठे, भगवान चव्हाण, दादासाहेब पा साठे, वाल्मीक साठे, माधव साठे, अशोक थोरात, शरद साठे, कचरू साठे, अनिल साठे, सोमनाथ शेळके यांच्यासह ग्रामस्थ मोठयासंख्येने उपस्थित होते.