शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार

औरंगाबाद,२४ डिसेंबर / प्रतिनिधी :-कन्नड तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा फडकला. गव्हाली येथील नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा आज शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणूकित भगवा फडकविण्यासाठी आतापासून सज्ज रहा, असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.सत्कारप्रसंगी उपतालुकाप्रमुख गीतराम पवार, युवासेना तालुका अधिकारी योगेश पवार, शाखाप्रमुख सुखदेव काळे,  सरपंच वर्षा रविंद्र काळे, सविता काळे, बद्रीनारायण निकम, कांताबाई कदम आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.