जालना जिल्ह्यात 66 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

60 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि. 25 :- जालना शहरातील समर्थ नगर -3, चमन -1, वाल्मीक नगर -1, शांकुतलनगर -1, गणपती गल्ली -1,सराफ नगर -1, नुतन वसाहत -5, लक्ष्मीकांत नगर -1, एस. आर. पी. एफ.-4, बेथल -1, लालवाडी -12, दुसरबीड -1, मांडवा ता. बदनापुर -1, राजपुत मोहल्ला अंबड -1, खामगाव -1, बावणे पांगरी -4, शेलगाव -1, फत्तेपुर -9, देशमुख गल्ली भोकरदन -3, मंठा -8 अशा एकुण 60 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर घनसावंगी -3, सामान्य रुग्णालय परिसर -18, भोकरदन -1, खाजगी रुग्णालय -5, प्राथमिक आरोग्य केंद्र शेलगाव -4, परतुर -1, डोणगाव -1, माहोरा -2, वरुड -3, अंबड -1, नेर -1 एकुण 40 व्यक्तींच्या आरटी पीसीआर तपासणीद्वारे पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 26 अशा एकुण 66 व्यक्तींच्या अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9828असुन सध्या रुग्णालयात -185 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3661, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-249,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-31036 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-53, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 66(ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -4289 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-26376, रिजेक्टेड नमुने -47, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने – 271, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3123
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -24, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-3262 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती – 49 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-278,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-21, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -185,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती – 58,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-60 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-3044, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या – 1116 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-48729तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या – 129 एवढी आहे.

आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली यात तिर्थपुरी ता. घनसावंगी येथील 70 वर्षीय महिला व जालना शहरातील करवानगर परिसरातील 67 वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 23 नागरीकांकडून 4 हजार 900 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 4 हजार 305 नागरिकांकडुन 9 लाख 15 हजार760 रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *