जैन समाजाच्या तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ घोषित ; वैजापूर येथे सकल जैन समाजातर्फे झारखंड सरकारच्या निर्णयाचा मूक मोर्चा काढून निषेध

वैजापूर,२१ डिसेंबर / प्रतिनिधी :-सकल जैन समाजाचे अतिशय पवित्र पावन तीर्थक्षेत्र असलेल्या श्री.सम्मेदशिखरजी परिसराला झारखंड सरकारने पर्यटनस्थळ म्हणून घोषित केल्याच्या निषेधार्थ व श्री सम्मेदशिखरजी तिर्थक्षेत्राची पवित्रता गरिमा टिकवण्यासाठी सकल जैन समाज वैजापूर शहर व तालुकातर्फे बुधवारी ( ता.21)  वैजापूर येथे मूक निदर्शने व मोर्चा काढत उपविभागीय जिल्हाधिकारी माणिक आहेर व तहसीलदार राहुल गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. 

या प्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी,  वैजापूर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन रवींद्र (बाळासाहेब संचेती), जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते मेजर सुभाष संचेती,  भाजपा व्यापारी आघाडीचे निलेशकुमार पारख, नगरसेवक गणेश खैरे, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, नगरसेवक स्वप्नील जेजुरकर, उल्हास पाटील ठोंबरे, वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रुपेश संचेती, माजी चेअरमन हेमंत संचेती, विजय कासलीवाल, डॉ.संतोष गंगवाल, शांतीलाल पहाडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाशचंद बोथरा, शोभाचंद संचेती, डॉ.अभिजीत अन्नदाते, डॉ.अजित बोरा, संतोष कासलीवाल, आनंद गंगवाल, उमेश संचेती, महावीर बाफना, राजू संघवी, नंदलाल मुगदिया, प्रकाश छाजेड, प्रफुल संचेती, राजेंद्र संचेती, गौतम संचेती, नितीन चुडीवाल, डॉ.संघवी, संकेत चुडीवाल, कांतीलाल कासलीवाल, शितल लोहाडे, महावीर ठोळे, प्रविण कोतकर, विक्रम अग्रवाल, निखिल लुणावत, पारस चुडीवाल यांच्यासह शेकडो जैन बांधव उपस्थित होते. यावेळी पोस्ट कार्ड च्या माध्यमातून देखील प्रधानमंत्री कार्यालय येथे पत्र  पाठवत आपल्या भावना व्यक्त करण्यात आल्या. 

या प्रसंगी नगराध्यक्ष दिनेशसिंग परदेशी,  बाळासाहेब संचेती, शांतीलाल पहाडे, राजेंद्र संचेती यांनी आपल्या भाषणातून झारखंड सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करत सदरील पर्यटन स्थळ आदेश रद्द करण्यात यावा अशी मागणी केली.