जालना जिल्ह्यात 81 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

87 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

जालना दि. 25 :- जालना शहरातील एकुण 87 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.जालना शहरातील एकुण 63 व्यक्तींच्या आरटी पीसीआर तपासणीद्वारे पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 18 अशा एकुण 81 व्यक्तींच्या अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9767 असुन सध्या रुग्णालयात -191 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3640, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-135,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-30437 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 81(ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -4223 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-25906, रिजेक्टेड नमुने -47, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने – 210, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3102
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -57, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-3238 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती – 30 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-278,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-37, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -191,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती – 48,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-87 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-2984, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या – 1112 (24 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-48272 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या – 127 एवढी आहे.

आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली यात देऊळगाव मही येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 32 नागरीकांकडून 6 हजार 200 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 4 हजार 282 नागरिकांकडुन 9 लाख 10 हजार 860 रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *